Thursday, February 12, 2026
Home ताज्या बातम्या चाळावरून टाळावर आलेल्या जामखेड च्या नागेश्वर यात्रेनिमित्त पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

चाळावरून टाळावर आलेल्या जामखेड च्या नागेश्वर यात्रेनिमित्त पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

0
695

जामखेड न्युज——–

चाळावरून टाळावर आलेल्या जामखेड च्या नागेश्वर यात्रेनिमित्त पालखी सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न

एकेकाळी संपूर्ण महाराष्ट्रात चाळासाठी प्रसिद्ध असलेली जामखेड ची नागपंचमी आता टाळावर आलेली आहे. काल भक्तिमय वातावरणात वारकरी परंपरेनुसार टाळ मृदुंगाच्या जयघोषात जामखेडला मंगळवारी श्रीनागेश्वर पालखी सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. यावर्षी महिलांची संख्या लक्षणीय होती. शुध्द वारकरी परंपरेने हा पालखी सोहळा संपन्न झाला.

जामखेडचे ग्रामदैवत श्रीनागेश्वरची नागपंचमीच्या निमित्ताने यात्रा असते.गेल्या २२ वर्षापासून यानिमित्ताने श्रीनागेश्वर पालखी सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. मंगळवारी सकाळपासूनच येथे मोठ्या उत्साहाचे वातावरण होते. मंगळवारी प्रातःकाळी यजमान जामखेड चे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्या हस्ते सकाळी महापुजा करण्यात आली.

दरम्यान पंचक्रोशीतील सर्व भजनी मंडळांनी मंदिरासमोर भजन सुरू केले. विठोबा रखुमाई भजन होताच यांच्या पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हस्ते पालखीमध्ये मुखवटा स्थापन करण्यात आला. यावेळी. यावेळी तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ हा महादेवाचा अभंग घेऊन पालखीचे प्रस्थान झाले. यावेळी एकच जयजयकार झाला ही पालखी रथामध्ये ठेवण्यात आली नंतर हरहर महादेवाच्या ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय नागेश्वराय शिव नागेश्वराय व ज्ञानोबा तुकाराम च्या जयघोषात व पंचक्रोशीतील भजनी मंडळांच्या टाळ मृदुंगांच्या गजरात पालखी मिरवणुकीस सुरुवात झाली.

श्रीनागेश्वर मंदिरापासून पालखी मिरवणूक सुरू झाली. श्रीनागेश्वर महाद्वारापासून खर्डा रस्ता, पुण्यश्लोक अहिल्यादेवी चौक, लक्ष्मी चौक, संविधान चौक, श्रीविठ्ठल मंदिर, छत्रपती शिवाजी महाराजपेठ, शनी मारुती मंदिर, जयहिंद चौक, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज मार्ग, जुने कोर्ट, महादेव गल्ली लक्ष्मी चौक मार्गे वैतरणा नदी तीरातून नव्याने निर्माण करण्यात आलेल्या पालखी मार्गावरून हा सोहळा पुन्हा श्रीनागेश्वर मंदिर येथे पोहोचला. कीर्तन मंडपात दिंडी पोहोचल्यानंतर संत भार पंढरीत हा अभंग घेण्यात आला व सांगता आरती करण्यात आली. विठ्ठल भजनी मंडळ, श्रीनागेश्वर भजनी मंडळ, तपनेश्वर भजनी मंडळ, जमादारवाडी भजनी मंडळ, संत वामनभाऊ महाराज वारकरी शिक्षण संस्था, जगदाळे वस्ती भजनी मंडळ, बोराटे वस्ती भजनी मंडळ, बटेवाडी भजनी मंडळ व पंचक्रोशीतील भजनी मंडळे यावेळी सहभागी झाले होते.

या निमित्ताने सुरू असलेल्या नाम सप्ताहामध्ये जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांचे वंशज कान्होबा महाराज देहुकर यांचे रात्री किर्तन झाले गुरुवार दिनांक ३१ जुलै रोजी सकाळी दहा ते बारा या वेळेत चेतन महाराज बोरसे मालेगाव यांचे कारल्याचे कीर्तन होईल व महाप्रसादाने या संपूर्ण उत्सवाची सांगता होईल.

यावेळी प्रा. मधुकर राळेभात , प्रा. ज्ञानदेव कुंभार , गणेश डोंगरे ,संजीवन मेंढकर शिवनेरीचे कॅप्टन भोरे ,पांडूराजे भोसले , संजय काशीद दिगंबर चव्हाण, आदी उपस्थित होते.

दिंडी मार्गावर महिलांनी सडा रांगोळी केली होती.शहरात ठिकठिकाणी पालखी दर्शनासाठी भक्तांनी गर्दी केली होती.एकूणच संपूर्ण जामखेड शहर आज भक्तीमय झाले होते.

या संपूर्ण उत्सवासाठी श्रीनागेश्वर सेवा मंडळाचे बाबासाहेब खराडे, बबलू देशमुख, मिलिंद ब्रम्हे, संतोष बारगजे, विनायक राऊत, शंकर राऊत, प्रवीण राऊत, आनंद राजगुरू, दिलीप कुमार राजगुरू, महादेव पानसाडे, सिताराम राळेभात,उमेश देशमुख, राजेंद्र देशपांडे, दत्तात्रय काळे,सत्येंद्र पाटील, श्याम क्षिरसागर, किरण सोनवणे, नंदू शिंदे, दर्शन भोसले, आदित्य पोकळे, ओम भोसले, कृष्णा मिसाळ, रोहित खवळे, रोहन बांदल
सुमित बकरे, आर्यन धनवडे, ओम काकडे, अक्षय राळेभात, रोहित शिंदे, रोहित कोल्हे, सचिन म्हेत्रे, रोहित पोकळे यांच्या सह अनेकांनी अहोरात्र अथक परिश्रम घेतले

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!