विजेचा धक्का लागून शेतकऱ्याचा मृत्यू, जामखेड तालुक्यातील घटना
जामखेड तालुक्यातील मतेवाडी येथील नवनाथ बाबुराव मस्तुद वय 45 या शेतकऱ्याचा त्यांच्या शेतातील विहिरीवरील विद्युत मोटर चालू करण्यासाठी गेला असता विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. यामुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
नवनाथ मस्तुद हे शुक्रवार दि. 6 जून रोजी सायंकाळी सहा वाजता शेतातील विहिरीवरील विद्युत मोटर चालू करण्यासाठी गेले होते यावेळी विजेचा धक्का बसला यात त्यांचा मृत्यू झाला आहे.
नवनाथ मस्तुद यांच्या मागे पत्नी, दोन मुले, एक सुन, नातवंडे असा परिवार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार नवनाथ मस्तुद हे शुक्रवार दि 6 रोजी सायंकाळी ६ वाजता आपल्या शेतातील विहिरीवरील विद्युत मोटर चालू करण्यासाठी गेले होते. तेथील पत्र्याच्या पेटीत असणारे विद्युत मोटर चे बटण चालू करत असताना विजेचा धक्का बसला यात ते जागीच बेशुद्ध पडले.
घरच्यांनी तात्काळ त्यांना ग्रामीण रूग्णालय जामखेड येथे उपचारासाठी दाखल केले. डॉक्टरांनी तपासा अंती मृत घोषित केले.
या घटनेबाबत जामखेड पोलीस स्टेशनला आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.