जामखेडमध्ये प्लंबिंग दुकाने फोडली पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास विठठल सेल्स व बालाजी ट्रेडर्स दुकानात चोरी

0
1759

जामखेड न्युज—–

जामखेडमध्ये प्लंबिंग दुकाने फोडली पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास

विठठल सेल्स व बालाजी ट्रेडर्स दुकानात चोरी

जामखेड शहरातील बीड रोडवरील विठठल सेल्स व शासकीय दुध डेअरी समोरील बालाजी ट्रेडर्स या दोन्ही दुकानात दि. ७ च्या रात्री व दि. ८ च्या पहाटे अज्ञात चोरट्यांनी दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून दुकानातील प्लबिंग साहित्यासह रोख रक्कम लंपास केली आहे. दोन्ही दुकानातील सुमारे पावणेतीन लाखांचा ऐवज लंपास झाला आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अभिषेक विठठल रेडे वय-24 वर्षे धंदा- प्लबिंग दुकान यांनी जामखेड पोलीस स्टेशनला दाखल केलेल्या तक्रारी म्हटले आहे की माझे जामखेड ते बीड जाणारे रोड लगत नवले पेट्रोल पंपाचे समोर माझे विठठल सेल्स नावाचे प्लबिंग मटेरीयल चे दुकान असुन ते दुकान चालवुन मी माझे कुटुंबाचा उदरनिर्वाह करतो. सदरचे दुकान मी सकाळी 10.00वा. सुमारास चालु करुन रात्री 08.00 वा. चे सुमारास दुकान व्यवस्थीत बंद करुन घरी जात असतो.

दि.07.06.2025 रोजी सकाळी 10.00 वा चे सुमारास मी माझे जामखेड ते बीड जाणारे रोड लगत नवले पेट्रोल पंपाचे समोर असणारे माझे विठठल सेल्स नावाचे प्लबिंग मटेरीयल नावाचे दुकानावर आलो होतो. दिवसभर दुकानावर काम करुन रात्री 08.00 वा चे सुमारास दुकान व्यवस्थीत बंद करुन माझे घरी गेलो होतो.

दि.08.06.2025 रोजी सकाळी 10.00 वा. चे सुमारास दुकानावर आलो व दुकान उघडले असता मला दुकानातील साहीत्य अस्ताव्यस्त पडलेले दिसले तसेच दुकानाचे मागिल बाजुचे शटर व दरवाजा उघडा दिसला त्यांनतर सदरचा प्रकार मी माझा भाऊ विशाल विठठल रेडे, मावस भाऊ प्रमोद सिताराम पवार, वडील विठठल केरबा रेडे, चुलते बजरंग केरा रेडे यांना सांगितला त्यांनतर ते दुकानात आले.

त्यांनतर आम्ही दुकानातील सामानाची पाहणी केली असता दुकानातील विक्री साठी आणलेले नळ फॅिटिंगचे साहीत्य, काउंटर मधील 50,000/-रुपये रोख रक्कम तसेच इनव्हर्टर मिळुन आले नाही म्हणुन आमची खात्री झाली की, कोणीतरी अज्ञात चोरटयाने माझे संमती शिवाय लबाडीचे इरादाने स्वत:चे अर्थिक फायद्यासाठी माझे दुकानातील सामानाची चोरी केली आहे.

चोरीस गेलेल्या साहीत्याचे व रोख रक्कम याचे वर्णन खालील प्रमाणे
1) 60000/- रुपये किं चे जॉनसन कंपनीचे 12 वॉल मिक्सर प्रत्यकी 5000 /- रुपये किंमतीचे
2) 63000/- रुपये किं चे जॉनसन कंपनीचे बाथरुम व किचनचे 42 नळ प्रत्येकी 1500 /- रुपयेकिंमतीचे
3) 26,000/- रुपये किं चे प्लंब फलो कंपनीचे बाथरुम फिटींगचे साहीत्य
4) 15000/- रुपये किंमतीचे इंनव्हर्टर व एक्साईड कंपनीची बॅटरी जु.वा.किं.अं.
5)50,000/- रुपये रोख रक्कम त्यात 500 /- रुपये दराच्या 100 नोटा अशा प्रकारे सुमारे 2,14,000 रुपये एकुण माल लंपास झाला आहे.

तसेच बीड रोडवरील शासकीय दुध संघाच्या समोर
बालाजी ट्रेडर्स नावाचे दुकानात देखील चोरी झाल्याची घटना समोर आली आहे. याही दुकानातील पन्नास हजार रुपयांचे प्लबिंग चे साहित्य व चार हजार रुपये रोख लंपास झाले आहे.

जामखेड शहरातील दोन्ही प्लबिंग च्या दुकानातील लाखो रुपयांचे प्लबिंग साहित्य व रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. वरील घटनेचा तपास पोलीस निरीक्षक महेश पाटील करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here