प्रशासनाच्या नाकावर टिचून जामखेड मध्ये मटका पेढ्या व इतर अवैध धंदे राजरोसपणे सुरूच!!!

0
519

जामखेड न्युज—–

प्रशासनाच्या नाकावर टिचून जामखेड मध्ये मटका पेढ्या व इतर अवैध धंदे राजरोसपणे सुरूच!!!

जामखेड शहरात अवैध धंदे सुरू असल्याच्या बातम्या प्रसिद्ध होताच अनेक ठिकाणच्या मटक्याच्या टपऱ्या बंद होत्या मात्र काही ठिकाणी अजूनही राजरोसपणे मटका सुरू आहे. त्यामुळे बातम्या मुळे प्रशासनाने थातूरमातूर कारवाई केल्याचे दिसून येत आहे. तर काही ठिकाणी मटका पेढीवाले प्रशासनाच्या आदेशाला न जुमानता मटका घेतच आहेत. प्रशासनाच्या नाकावर टिचून मटका पेढ्या राजरोसपणे सुरूच आहेत.
नवनियुक्त पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी पदभार स्विकारताच जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा घातला जाईल तसेच अवैध धंदे बंद करण्यात येतील असे सांगितले होते पण जामखेड शहरासह तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध धंदे सुरू आहेत. याकडे प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे. 

मटका पेढीवाले प्रशासनाच्या नाकावर टिचून मटका पेढ्या राजरोसपणे चालवतात याकडे प्रशासन अर्थपूर्ण दुर्लक्ष करत आहे. जामखेड परिसरात गुन्हेगारी वाढण्याची कारणे म्हणजे कलाकेंद्र हे एक कारण आहे. कलाकेंद्र नियमानुसार चालवावेत अशी मागणी होत आहे.


कलाकेंद्रात कलेऐवजी डीजेच्या थयथयाट, कर्णकर्कश आवाज सुरूच आहे. परिसरात मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय सुरू आहे. रात्रंदिवस परिसरातील अनेक हाँटेलवर आँनकाँल मुलींना बोलावले जाते. तसेच कलाकेंद्रात संपूर्ण राज्यभरातील हवसे, नवसे, गवसे यांचा राजरोसपणे कलाकेंद्रात वावर असतो. अनेक गुन्हेगार या ठिकाणी आश्रय घेतात. यामुळे गोळीबाराच्या घटना घडतात.


जामखेड शहर व तालुक्यात मटका, जुगार, दारू असे अवैध धंदे खुले आम चालू आहे. मटका जुगारामुळे अनेकांचे संसार मोडले आहे. खुले आम चालू असलेल्या या अवैध धंद्याचा कधी बिमोड होणार अशी नागरिकांमध्ये चर्चा आहे. कोणाच्या आशिर्वादाने हे अवैध धंद्याना अभय मिळत आहे. हेच खरे कोडे आहे.


शहरातील भुतवडा रोड बाजारतळ वरील नगरपरिषद गाळ्यातील मटका पेढ्या बंद करण्यात आल्या मात्र तपनेश्वर भागातील कल्याण व मुंबई मटका सकाळ पासून ते रात्री बारा एक वाजेपर्यंत चालू असतो. अनेकजण मटक्याचे रेकॉर्ड चाळत असतात. कल्याण मटका सकाळ नऊ ते एक या वेळेत ओपन तर चारच्या दरम्यान क्लोज येतो. तर मुंबई मटका दुपारी दोन ते रात्री नऊ वाजेपर्यंत ओपन व रात्री बारा एकच्या सुमारास क्लोज येतो. तसेच बंद टपऱ्यात आँनलाईन मटका घेणे सुरूच आहे. 

मटक्यामुळे अनेकांची झोप हैराण झाली असून अर्थिक गणित बिघडले आहे. जामखेड शहर व तालुक्यात किरकोळ कारणावरून गोळीबार सारखे घटना घडत आहेत. हाणामाऱ्या ही नित्याची बाब झाली आहे. गुंडगिरी मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. कर्णकर्कश आवाजाचे हॉर्न, वाहतूक कोंडी, अस्ताव्यस्त लावलेली वाहने अनेक ठिकाणी मावा गुटखा पान टपरी च्या नावाखाली नशेच्या पदार्थाची विक्री होत आहे. यामुळे तरूण वर्ग नशेच्या आहारी जात आहे.

अनेक दोन नंबर करणारे व्हॉईट कॉलर जोमात धंदे करीत आहे व यांना आशिर्वाद कोणाचा भेटत आहे अशी चर्चा नागरिकांमध्ये होत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here