छत्रपती शिवाजी महाराजांनी शास्त्र व शस्त्र यातून हिंदवी स्वराज्य निर्माण केले – हभप कल्याण महाराज काळे पहाडी आवाजाने कीर्तन व पोवाड्याच्या माध्यमातून जामखेड करांच्या अंगावर शहारे
छत्रपती शिवाजी महाराजांनी शास्त्र व शस्त्र यातून हिंदवी स्वराज्य निर्माण केले – हभप कल्याण महाराज काळे
पहाडी आवाजाने कीर्तन व पोवाड्याच्या माध्यमातून जामखेड करांच्या अंगावर शहारे
शस्त्र आणि शास्त्र या दोन्हींचा वापर करून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केले, महाराजांनी केवळ शस्त्रे आणि युद्ध कौशल्ये वापरून नव्हे, तर राज्य व्यवस्थापन, सामाजिक सुधारणा आणि सांस्कृतिक प्रगती यांवरही भर दिला. महाराजांमुळे देव धर्म देश टिकला त्यांचीमंदिरे नसले तरी ते प्रत्येकाच्या ह्दयात आहेत. असे हभप कल्याण महाराज काळे यांनी आपल्या कीर्तनातून सांगितले.
जामखेड शहरात शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या वतीने दि. ६ ते ९ पर्यंत भारूड, कीर्तन, रक्तदान शिबीर,भव्य दिव्य अशी मिरवणूक अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. रविवारी हभप कल्याण महाराज काळे यांचे किर्तन व पोवाड्याचा कार्यक्रमात त्यांनी उपस्थितांच्या अंगावर शहारे आणले. यावेळी हभप आसाराम महाराज साबळे, हभप वायसे महाराज, हभप हरीभाऊ काळे, हभप राजेंद्र म्हेत्रे, हभप हमीद सय्यद महाराज भारूड सम्राट, हभप विकास महाराज, हभप अंगद महाराज यांच्या सह अनेक मान्यवर महाराज उपस्थित होते.
यावेळी त्यांनी कीर्तन व पोवाड्याच्या माध्यमातून आपल्या पहाडी आवाजाने अंगावर शहारे आणले ते म्हणाले की, किती दिवस जगले महत्त्वाचे नाही कसे जगले जगात मोठे होण्यासाठी नम्रता, लीनता व इतरांबद्दल आदर हवा तसेच स्वतः पेक्षा इतरांसाठी जगले पाहिजे. यावेळी त्यांनी कीर्तनासाठी पुढील अभंग निवडला होता. ऐसा पुत्र देंई संतां । तरी त्या आवडी पंढरिनाथा ॥१॥ गीता नित्य नेमें । वाची ज्ञानेश्वरी प्रेमें ॥२॥ संतांच्या चरणा । करी मस्तक ठेंगणा ॥३॥ कन्या व्हावी भागीरथी । तुझे प्रेम जिचे चित्तीं ॥४॥ ऐसे करी संतजना । दासी जनीच्या निधाना ॥५॥
पोवाड्याच्या माध्यमातून कल्याण महाराज काळे यांनी लोकांच्या अंगावर शहारे आणले. त्यांच्या आवाजात आणि गायनशैलीत एक वेगळी ऊर्जा होती त्यांनी शिवाजी महाराजांच्या चरणांवर आधारित पोवाडे आणि किर्तन केले.
कल्याण महाराज काळे यांच्याबद्दल अधिक माहिती
शिवशाहीर कल्याण महाराज काळे हे एक प्रसिद्ध शिवशाहीर आहेत, जे शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे आणि किर्तन सादर करतात.
लोकप्रियता त्यांच्या गायनशैलीमुळे आणि आवाजामुळे ते महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे पोवाडे आणि किर्तन लोकांना खूप आवडतात.
शिवाजी महाराजांवरील कार्य कल्याण महाराज काळे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक पोवाडे आणि किर्तन सादर केले आहेत, ज्यामध्ये त्यांच्या कार्याची आणि पराक्रमाची माहिती दिली जाते.
अंगावर शहारे आणणारे किर्तन कल्याण महाराज काळे यांचे किर्तन ऐकल्यावर लोकांना अंगावर शहारे येतात आणि त्यांच्या मनात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. असे किर्तन आज जामखेड करांना अनुभवता येणार आहे.
आज सोमवार 9 जुन रोजी पहाटे सप्तनद्या, गडकोट किल्ले, तीर्थक्षेत्र येथून आणलेल्या पवित्र जलाने शिवछत्रपतींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात आला. दुपारी 2.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती पासून श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे.