वादळी वाऱ्यासह पावसामुळे जामखेड तालुक्यातील अरणगाव, पारेवाडी व जवळा परिसरात फळबाग व घराचे नुकसान
आज शनिवार दुपारी झालेल्या वादळी पावसामुळे अरणगाव, पारेवाडी, जवळा परिसरातील फळबागेचे तसेच झाडे घरावर पडल्याने घरांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश तहसीलदार यांनी दिले आहेत.
आज दुपारी अचानक वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू झाला यामुळे अरणगाव परिसरात चिंतामण राऊत यांच्या घरावर झाड पडल्याने घराचे नुकसान झाले तसेच सिद्धेश्वर शिंदे यांच्या शेतातील लिंबोणीचे झाडे उन्मळून पडल्याने मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तसेच पारेवाडी येथे मोठ मोठे चिंचाचे झाडे रस्त्यावर पडल्याने वाहतुकीचा काही काळ खोळंबा झाला होता.
तसेच जवळा परिसरातही वादळी वाऱ्यासह पावसामुळे काही घरांचे नुकसान झाले आहे. जामखेड चे तहसीलदार गणेश माळी यांनी नुकसान ग्रस्त भागाचे पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत.
या वर्षी मे महिन्यात मोठ्या प्रमाणावर अवकाळी पाऊस झाला होता यावेळीही काही प्रमाणात शेतीचे नुकसान झाले होते. तसेच आजपासून मृग नक्षत्र सुरू झाले आहे. खरीप पिकांची पेरणीसाठी आजपासून सुरूवात केली जाते.
आज अनेक लोकांनी पेरणीसाठी सुरूवात केली होती पण वादळी वाऱ्यासह पावसामुळे पेरण्या खोळंबल्या आहेत.