साकतचे माजी सरपंच व भाजपा युवा नेते कांतीलाल वराट यांनी पंचायत समिती निवडणूक लढवावी
वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात युवा कार्यकर्त्यांची मागणी
साकतचे माजी सरपंच व भाजपाचे युवा नेते सभापती प्रा राम शिंदे यांचे खंदे समर्थक कांतीलाल(चंद्रकांत) वराट यांचा नुकताच वाढदिवस विविध सामाजिक उपक्रमांनी साजरा झाला. यावेळी साकत गणातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने जमा झाले होते. तेव्हा युवा कार्यक्रर्त्यांचा एक सुरात एकच मागणी केली ती म्हणजे कांतीलाल वराट यांनी पंचायत समिती निवडणूक लढवावी अशी मागणी केली.
कांतीलाल वराट हे युवकांच्या गळ्यातील ताईत म्हणून ओळखले जातात. नेहमी तरूणांच्या गराड्यात असतात. सरपंच पदाच्या काळात अनेक विकास कामे मार्गी लावलेली आहेत. मुख्यमंत्री पेयजल योजना मार्गी लावली. तसेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यात विठ्ठल मंदिर क वर्ग तीर्थक्षेत्र आराखड्यात बसवले यामुळे मंदिर परिसराचा विकास झाला आता दरवर्षी निधी प्राप्त होत आहे.
वाढदिवसानिमित्त साकत गणात विविध ठिकाणी वेगवेगळ्या सामाजिक उपक्रमांनी वाढदिवस साजरा करण्यात आला. यावेळी युवा कार्यकर्त्यांनी कांतीलाल वराट यांनी पंचायत समिती निवडणूक लढवावी अशी मागणी करण्यात आली.
यावेळी कैलास वराट उपसभापती कृषी उत्पन्न बाजार समिती जामखेड, प्रवीण बोलभट, विष्णू गंभीरे, बाजीराव गोपाळघरे, सुदाम वराट, अविनाश बोधले, पप्पू सय्यद, ईश्वर मुरुमकर, अमोल वराट, दत्ता घोलप, दादासाहेब मोहिते, विकास सांगळे, संजय डोके, बाबा बांगर, बाळू देडे, दत्ता ठेंगील, श्रीकांत रेडे, बाळू रेडे, दत्ता नेमाने, हनुमंत नेमाने, विशाल वराट, भीमराव टेकाळे, सोमा वराट, शिवाजी वराट, बाळासाहेब वराट, मिलिंद घोडेस्वार, विष्णू वराट, संदिप वराट, द्वारकादास वराट, अभिजित वराट, महादेव वराट, रामदास वराट यांच्या सह अनेक मान्यवर उपस्थित होते.
पंचायत समितीच्या माध्यमातून विधानपरिषदेचेसभापती प्रा राम शिंदे यांच्या माध्यमातून साकत गणाचा भरीव विकास करण्यात येईल.
कांतीलाल वराट यांनी सांगितले की, भाजपाने उमेदवारी दिल्यास मित्रमंडळी व कार्यकर्ते यांच्या बळावर निश्चितच विजय प्राप्त केला जाईल. व परिसराचा विकास केला जाईल असे वराट यांनी सांगितले.