जामखेड मध्ये आज शिवशाहीर हभप कल्याण महाराज काळे यांचे अंगावर शहारे आणणारे किर्तन, दिवसभर रक्तदान शिबीर

0
323

जामखेड न्युज—–

जामखेड मध्ये आज शिवशाहीर हभप कल्याण महाराज काळे यांचे अंगावर शहारे आणणारे किर्तन, दिवसभर रक्तदान शिबीर

ज्यांच्या पोवाड्यांमुळे आणि कीर्तनांमुळे लोकांच्या अंगावर शहारे येतात. त्यांच्या आवाजात आणि गायनशैलीत एक वेगळी ऊर्जा आहे. ते शिवाजी महाराजांच्या चरणांवर आधारित विविध पोवाडे आणि किर्तन करतात असे हभप कल्याण महाराज काळे यांचे आज जामखेड शहरात किर्तन आयोजित करण्यात आले आहे तरी भाविक भक्त व शिवभक्तांनी या सुवर्ण संधीचा लाभ घ्यावा असे आवाहन शिवराज्याभिषेक सोहळा समितीच्या वतीने करण्यात आले आहे.

जामखेड शहरात शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त शिवराज्याभिषेक उत्सव समितीच्या वतीने दि. ६ ते ९ पर्यंत भारूड, कीर्तन, रक्तदान शिबीर,भव्य दिव्य अशी मिरवणूक अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यानिमित्ताने पहिल्या दिवशी प्रसिद्ध भारुडाचा कार्यक्रम झाला काल हभप शांतीब्रम्ह संत एकनाथ महाराज यांचे 14 वे वंशज हभप श्री योगीराज महाराज गोसावी श्री क्षेत्र पैठण जि संभाजीनगर यांचे कीर्तन झाले. तर आज शिवशाहीर हभप कल्याण महाराज काळे यांचे अंगावर शहारे आणणारे किर्तन होईल, आज दिवसभर रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात येणार आहे.

कल्याण महाराज काळे यांच्याबद्दल अधिक माहिती

शिवशाहीर
कल्याण महाराज काळे हे एक प्रसिद्ध शिवशाहीर आहेत, जे शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित पोवाडे आणि किर्तन सादर करतात.

लोकप्रियता
त्यांच्या गायनशैलीमुळे आणि आवाजामुळे ते महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे पोवाडे आणि किर्तन लोकांना खूप आवडतात.

शिवाजी महाराजांवरील कार्य
कल्याण महाराज काळे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनावर आधारित अनेक पोवाडे आणि किर्तन सादर केले आहेत, ज्यामध्ये त्यांच्या कार्याची आणि पराक्रमाची माहिती दिली जाते.

अंगावर शहारे आणणारे किर्तन
कल्याण महाराज काळे यांचे किर्तन ऐकल्यावर लोकांना अंगावर शहारे येतात आणि त्यांच्या मनात एक वेगळी ऊर्जा निर्माण होते. असे किर्तन आज जामखेड करांना अनुभवता येणार आहे.

आज रविवार दि. 8 जून रोजी रात्री 8 ते 10 शिवशाहीर हभप कल्याण महाराज काळे शेवगाव यांचे कीर्तन होईल तसेच सकाळी 8 ते सायंकाळी 5 पर्यंत भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन केले आहे. वरील सर्व कार्यक्रमाचे ठिकाण छत्रपती संभाजी महाराज मार्ग तहसील कार्यालयाच्या समोर जामखेड येथे असेल.

उद्यासोमवार 9 जुन रोजी पहाटे सप्तनद्या, गडकोट किल्ले, तीर्थक्षेत्र येथून आणलेल्या पवित्र जलाने शिवछत्रपतींच्या मूर्तीवर अभिषेक करण्यात येईल. दुपारी 2.15 वाजता छत्रपती शिवाजी महाराज कृषी उत्पन्न बाजार समिती पासून श्री शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य दिव्य अशी मिरवणूक निघणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here