जामखेड मध्ये अनेक तरुण घातक नशेच्या आहारी नशेच्या धुंदीत अनेकांवर जीवघेणा हल्ला

0
3195

जामखेड न्युज—–

जामखेड मध्ये अनेक तरुण घातक नशेच्या आहारी

नशेच्या धुंदीत अनेकांवर जीवघेणा हल्ला

जामखेड परिसरात अनेक अवैध धंदे राजरोसपणे सुरू आहेत. यात तरूण वर्ग मोठ्या प्रमाणात उत्तेजक नशेच्या आहारी गेले आहेत. नशा करून दहशत माजवण्याचा प्रयत्न करतात. तसेच अनाधिकृत कट्टे मोठ्या प्रमाणात वापरतात यामुळे सर्व सामान्य नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे सर्रासपणे विक्री होणाऱ्या उत्तेजक नशेच्या पदार्थावर बंदी घालणे आवश्यक आहे. अशी मागणी होत आहे.

पाच दिवसांपूर्वी शहरातील एका जीममध्ये
सलमान सुलेमान शेख (वय 29 वर्ष) धंदा मजुरी रा. पाण्याचे टाकी जवळ, सदाफुले वस्ती,जामखेड ता. जामखेड हे व्यायाम करत असताना या ठिकाणी सागर दत्तात्रय मोहळकर हा आला व म्हणाला तु जीम मध्ये उशीरा का आला असे म्हणुन मला शिवीगाळ करण्यास सुरवात केली. त्यावेळी मी त्यास समजावुन सांगत असताना त्यांने मला माझे गालावर चापट मारली व मला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मला कंबरेला धरुन वर उचलुन डोक्यावर व मानेवर फरशीवर आपटुन माझे डोक्याला व दोन्ही बरगडीला व पायाला गंभीर दुखापत केली. तशा प्रकारचा गुन्हा जामखेड पोलीस स्टेशनला दाखल झाला आहे. नशेच्या धुंदीत या घटना घडत आहेत अशी चर्चा जनतेत सुरू आहे. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की 30/05/2025 रोजी पहाटे 05/35 वा. सुमारास मी नेहमी प्रमाणे शहरातील जिम करण्यासाठी गेलो असता तेथे माझे ओळखीचा सागर दत्तात्रय मोहळकर रा. जामखेड ता. जामखेड जि. अहिल्यानगर हा माझ्याजवळ आला व मला म्हणाला की, तु जीम मध्ये उशीरा का आला असे म्हणुन मला शिवीगाळ करण्यास सुरवात केली.

त्यावेळी मी त्यास समजावुन सांगत असताना त्यांने मला माझे गालावर चापट मारली व मला जिवे ठार मारण्याच्या उद्देशाने मला कंबरेला धरुन वर उचलुन डोक्यावर व मानेवर फरशीवर आपटुन माझे डोक्याला व दोन्ही बरगडीला व पायाला गंभीर दुखापत झाल्याने मी बेशुध्द झालो.

तेथे जिम करत असेलले रोहीत जमदाडे, व इतर दोघांनी मला खाजगी गाडीने समर्थ हॉस्पीटल, जामखेड येथे उपचारकामी दाखल केले तसा गुन्हा जामखेड पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आला आहे.

जामखेड परिसरात उत्तेजक नशेच्या आहारी अनेक तरुण वर्ग गेलेला आहे. नशेच्या धुंदीत मोठ्या प्रमाणात दहशत माजवली जाते यातून अनेक दुर्दैवी घटना घडतात. याकडे प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे. परिसरात कोठे कोठे अवैध उत्तेजक नशेचे पदार्थ मिळतात. त्या ठिकाणी कडक कारवाई करणे आवश्यक आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here