जामखेड न्युज—–
अँड अरूण जाधव यांच्या वड्याचे तेल वांग्यावर या बातमीस रमेश आजबे यांचे जोरदार प्रतिउत्तर
उज्ज्वल जामखेड च्या भवितव्यासाठी कलाकेंद्र नियमानुसार चालवावेत काही प्रश्नच राहणार नाहीत
अँड. अरूण जाधव यांनी वड्याचे तेल वांग्यावर आणू नये गोळीबार व कलाकेंद्र काहीही संबंध नाही अशा आशयाची बातमी दिली होती या बातमीस सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. गोळीबार करणारे जामखेड मध्ये कशासाठी आले होते. ते कोठे कोठे गेले हे अरूण जाधव यांनी पाहावे. जर नियमानुसार कलाकेंद्र चालले वेळेची मर्यादा पाळली तसेच कलाकेंद्रात सीसीटीव्ही लावले तर गुन्हेगारी प्रवृत्तीला आळा बसेल, बाहेरचे गुन्हेगार जामखेड मध्ये येवून गोळीबार करणार नाहीत. उज्ज्वल जामखेड च्या भवितव्यासाठी कलाकेंद्र नियमानुसार चालले तर काहीच प्रश्नच राहणार नाहीत असे सामाजिक कार्यकर्ते रमेश आजबे यांनी जोरदार प्रतिउत्तर दिले आहे. तसेच अँड अरूण जाधव यांनी कलाकेंद्रात सीसीटीव्ही बसवण्यासाठी आंदोलन करावे असेही सांगितले.
आजबे यांनी म्हटले आहे की, ज्या पोरांनी गोळीबार केला ते पोर मटका धंद्याशी निगडित आहेत आणि ते पोरं जामखेडला येऊन दोन थेअटर वर जाऊन नंगानाच करून येतात आणि नंगानाच केल्यानंतर दारूच्या नशेत येऊन ते गोळीबार करतात. त्यांचे जामखेडला यायचं कारण म्हणजे जामखेडचे थेअटर आणि तिथे चाललेला नंगानाच या पोरांचा जामखेडच्या थेअटरशी काय संबंध आहे. हे अरूण जाधव यांनी पाहावे जामखेड च्या थेअटर मधील अवैध धंदे व शहरातील अवैध धंदे यास प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे.
तसेच नगरपरिषदेच्या गळ्यामध्ये राजरोसपणे मटक्याचा धंदा चालत आहे याकडे मुख्याधिकारी यांचे अर्थपूर्ण दुर्लक्ष आहे. नगरपरिषद हद्दीत काही कलाकेंद्र आहेत. यातील अनेक कलाकेंद्र नियमांचे उल्लंघन करतात. यामुळे तरूण पिढी बिघडत चालली आहे. तुम्हाला जर एवढाच कला केंद्राचा पुळका असेल तर त्या कला केंद्रावर गाड्यांच्या एन्ट्री पासून ते आत चाललेल्या कलेपर्यंत सीसीटीव्ही बसवून द्या म्हणजे महाराष्ट्रातले अर्धे गुंड आणि त्या गुंडांच्या टोळ्यांमधील लोक पोलिसांना जामखेड मध्ये सापडतील आणि राहिला प्रश्न कुठल्या जातीवर बोलण्याचा तर ते मी कुठल्याही जाती वरती बोललो नाही आणि फक्त कला केंद्र मालक हे जामखेडचे आहेत तिथं कला दाखवणारे लोक दोन टक्के सुद्धा जामखेड मधील नाहीयेत सर्व बाहेर जिल्ह्यातून तिथं आलेली आहेत येथे कमी वयाच्या मुली बोलून त्यांना कोण वेश्याव्यवसाय करावयास लावत आहे. जामखेडकरांना माहिती आहे.
मी कोणी स्वयंभू पुढारी नाहीये मी समाजामध्ये काम करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मला बोलण्याचा अधिकार दिला आहे आणि त्या अधिकारावर मी बोलत आहे राहिला प्रश्न इतर तालुक्यांचा त्याचं मला काही घेणं देणं नाहीये मी काय तुमच्या इतका महाराष्ट्रात राबणारा मोठा पुढारी नाहीये आणि तुम्हाला जास्त पुळका त्या कला केंद्राचा येत असेल ना तर त्या कला केंद्रामुळे ज्या गोरगरीब घरांवर नांगर चालला, हजारो लोकांचे प्रपंच उध्वस्त झाले त्यांच्या जमिनी गेल्या त्यांचे घर गेले हे तुम्हाला दिसत नाही का? आणि कोण कुठल्या घरात जन्मावे हे देवाने ठरवले आहे उगाच गरिबीचा आव आणू नका त्यात कला केंद्रावर त्याच थिएटरमध्ये गोरगरीब लोकांच्या आयुष्य उध्वस्त झाले हे तुम्हाला दिसत नाही का? कलाकेंद्रावर कला कमी व इतर अश्लीलता जास्त आहे.