मनोज जरांगे पाटील यांची जामखेडमध्ये अवधूत पवार यांच्या घरी भेट
जामखेड येथील मराठा सेवक अवधूत पवार यांचे वडील प्रसिद्ध लेखक -कवी प्रा.आ.य.पवार यांचे नुकतेच निधन झाले. या पार्श्वभूमीवर मराठा संघर्ष योध्दा मनोज दादा जरांगे पाटील यांनी पवार यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची सांत्वनपर भेट घेतली. यावेळी मनोज जरांगे यांनी पवार कुटुंबीयाचे विचारपूस करून सांत्वन केले.
यावेळी बावी सोसायटीचे चेअरमन सुंदरदास बिरंगळ, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष तात्यासाहेब बांदल, संभाजी मुळे, संभाजी ढोले, दादासाहेब ढवळे, बाळासाहेब राऊत, किरण पवार,भाऊराजे शिंदे, महादेव डोके, हिरालाल घुमरे सर, कृष्णकुमार मुरुमकर आदि उपस्थित होते.
मनोज जरांगे पाटील यांच्या विषयी मनोज जरांगे पाटील हे मराठा आरक्षणाचं नेतृत्व करतात. मनोज जरांगे हे बीडचे रहिवासी आहेत. पण लग्नानंतर जालन्यातील शहागड ही त्यांनी आपली कर्मभूमी केली.
गेल्या 15 वर्षापासून मनोज जरांगे पाटील हे मराठा आंदोलनात सक्रिय आहेत. त्यांनी अनेक आंदोलनात भाग घेतला आहे. सतत आंदोलनात भाग घेत असल्याने घरातील आर्थिक अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी चार एकर जमिनीपैकी अडीच एकर जमीन विकली होती.
जरांगे त्यांनी शिवबा संघटना स्थापन करून आरक्षण आंदोलन सुरू केलं. कुटुंबापासून दूर राहून मनोज जरांगे पाटील गेल्या दोन वर्षापासून मराठा आरक्षणासाठी आंदोलन करत आहेत. प्रत्येक जिल्ह्यात जाऊन लाखा लाखाच्या सभा घेऊन मराठा समाजाला जागृत करत आहेत. मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं ही त्यांची प्रमुख मागणी आहे.
मनोज जरांगे यांनी जालन्यातील अंतरवली सराटीतून मराठा आरक्षणासाठी उपोषणं सुरू केली होती. त्यांनी अनेकवेळा उपोषण केलं. त्याचा परिणाम म्हणून मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्याचा आणि त्याचं वाटप सुरू करण्याचं काम सरकारने केलं. तसेच सगेसोयऱ्यांनाही आरक्षणाचा लाभ मिळावा म्हणून मनोज जरांगे पाठपुरावा करत आहेत. काही प्रमाणात त्याला यशही आलं आहे. मनोज जरांगे यांच्या आंदोलनाचं फलित म्हणून सरकारने मराठा समाजातील विद्यार्थ्यांसाठी विविध उपाययोजना केल्या आहेत.