जामखेडच्या श्रेयस वराट ची राष्ट्रीय वुशु स्पर्धेसाठी निवड
ऑल महाराष्ट्र वुशु असोसिएशनच्या वतीने आंबेगाव, पुणे येथे नुकतीच राज्यस्तरीय ज्युनिअर वुशु निवड चाचणी घेण्यात आली. या निवड चाचणीमध्ये आयडियल स्पोर्ट अकॅडमी, जामखेडचा खेळाडू श्रेयस सुदाम वराट याने प्रथम क्रमांक मिळवीला.
त्याची जुलैमध्ये होणाऱ्या राष्ट्रीय ज्युनिअर वुशु स्पर्धेसाठी निवड झाली आहे. तसेच मयूर शिरगिरे याला द्वितीय स्थान प्राप्त झाले.
या खेळाडूंना आंतरराष्ट्रीय खेळाडू व अहिल्यानगर वूशू जिल्हा संघटनेचे सचिव प्रशिक्षक लक्ष्मण उदमले उपाध्यक्ष श्याम पंडित यांचे मार्गदर्शन लाभले.
श्रेयस वराट च्या यशाबद्दल विधानपरिषदेचे सभापती प्रा राम शिंदे, आमदार रोहित पवार, सामाजिक कार्यकर्ते निलेश (भाऊ) गायवळ, प्रा. सचिन गायवळ, प्रा. मधुकर राळेभात, भाजपा शहर मंडल अध्यक्ष संजय काशिद, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, राजुरीचे सरपंच सागर कोल्हे,
माजी सभापती संजय वराट, डॉ. भगवानराव मुरूमकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शरद कार्ले, उपसभापती कैलास वराट,माजी सरपंच कांतीलाल वराट, शहादेव वराट, साकतचे सरपंच भाऊ पाटील, उपसरपंच राजाभाऊ वराट, मंगेश आजबे, रमेश आजबे, विठ्ठल वराट, आबा जायगुडे, रोहित थोरात, योगेश वाघमोडे, सुरेश राऊत, विशाल धोत्रे, सोहेल शेख,
श्री साकेश्वर विद्यालय मुख्याध्यापक व सर्व स्टाफ जामखेड मिडिया क्लब सह तालुक्यातील पत्रकार यांनी अभिनंदन केले आहे.