अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथमच जामखेड मध्ये भव्य संगीतमय ईस्ट लिंग शिव पूजा
मोठ्या संख्येने उपस्थित रहावे – जिल्हा उपाध्यक्ष शिवकुमार डोंगरे
विरशैव लिंगायत समाज याच्या वतीने प,पु, त्रिकालवंदनीय श्री.ष.ब्र.१०८ सद्गुरु सदाशिव शिवाचार्य महास्वामीजी (ब्रह्ममठ वेळापूर) यांची ग्रामप्रवेश मिरवणूक व नगर जिल्ह्यात प्रथमच संगीतमय पूजा होणार आहे.
दिनांक ३०/५/२००५ रोजी सकाळी ९ वाजता मिरवणूक लक्ष्मी आई चौक खर्डा रोड येथून सुरू होईल.
नंतर आशीर्वचन प्रवचन व महापूजा महाप्रसाद महावीर मंगल कार्यालय येथे होणार आहेत तरी सर्व शिवभक्तांनी महाराजांचा शुभ आशीर्वाद घेण्यासाठी यावे.
यावेळी उपस्थित वेळापूर ब्रह्ममठ चे मठाधिपती ष.ब्र .१०८ श्री .गुरु मुक्तेश्वर शिवाचार्य वेळापूरकर महाराज येणार आहेत.
तरी सर्वांनी सहभागी होऊन कार्यक्रमाची शोभा वाढवावी असे आव्हान वीरशैव लिंगायत समाजाच्या वतीने व लिंगायत समाज तालुका अध्यक्ष तथा शिवा संघटना जिल्हा उपाध्यक्षशिवकुमार डोंगरे यांनी केले आहे.
महापूजा चे ठिकाण महावीर मंगल कार्यालय नगर रोड जुने एस टी स्टँड शेजारी जामखेड आहे.