जामखेड मध्ये नेमके चाललय काय, एका तरूणाला चार जणांकडून रिंगण करून बेदम मारहाण, सहा जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

0
2072

जामखेड न्युज—–

जामखेड मध्ये नेमके चाललय काय, एका तरूणाला सहा जणांकडून रिंगण करून बेदम मारहाण, सहा जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल

जामखेडमध्ये गेल्या महिन्यात अनुसूचित जाती व नवबौध्द मुलांची शासकीय निवासी शाळा विद्यार्थी रॅगिंग करण्यात आली होती याही मुलाला रिंगण करून मारहाण करण्यात आली होती. हे प्रकरण ताजे असतानाच शहरातील सदाफुले वस्ती एका तरूणाला रिंगण करून मारहाण करण्यात आली आहे. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी सहा जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, मेसचे डब्बे देण्यासाठी रस्त्याने मोटारसायकल वरून जात असताना रस्त्याचे पाणी एका जणांच्या पायावर उडाले या कारणावरून चार जणांनी दुचाकीस्वाराला रिंगण करून लोखंडी रॉडने मारहाण केली. दुचाकीस्वाराचा हात फॅक्चर झाला. पोलिसांनी दुचाकीस्वाराच्या तक्रारीवरून भारतीय न्याय संहितेच्या विविध दहा कलमाद्वारे गुन्हा दाखल केला आहे.

जामखेड पोलीसात भूषण अनिल मेनकुदळे (रा. सदाफुले वस्ती जामखेड) यांनी फिर्याद दिली की, शुक्रवार दि 23 रोजी दुपारी एक वाजता मेसचे डब्बे देणेसाठी मोटारसायकल वरुन घरी जात असताना डॉ. धुमाळ यांचे जुने दवाखाण्या समोर रस्त्यावर साचलेले पाणी व चिखल यामुळे दुचाकी हळु चालवत होतो.

त्यावेळी समारुन हुजेब अन्वर कुरेशी हा त्याचे मोटारसायकल वरुन येत होता. त्यावेळी माझे मोटारसायकालचे टायरचे पाणी त्याचे पायावार उडाले व मी घरासमोर पोहचलो त्यावेळी तो माझे पाठीमागे हुजेब कुरेशी आला व पाणी का उडवले अशी विचारणा केली असता त्यास रोडवर पाणी साचल्याने चुकुन पाणी उडाले व सॉरी बोललो यावेळी आईने हुजेब कुरेशी यास समजवण्याचा प्रयत्न केला पण त्याने आईला शिवीगाळ केली व बघतो तुमच्याकडे म्हणून निघून गेला.

शुक्रवारी सायंकाळी आठ वाजता मेसचे डब्बे घेवुन दुचाकीने जात असताना महाजन सर यांचे घराचे समोर हुजेब अन्वर कुरेशी, आयान सय्यद(पुर्ण नाव माहित नाही), मारुफ शेख(पुर्ण नाव माहिती नाही), आफनान कुरेशी(पुर्ण नाव माहिती नाही) (सर्व रा. सदाफुले वस्ती जामखेड) व इतर दोन अनोळखी इसमानी दुचाकी आडवली त्यावेळी हुजेब अन्वर कुरेशी याने त्याचे हातातील लोंखडी रॉडने मला मारण्यास सुरवात केली. मी गाडी सोडुन पळुन जात आसताना हुजेब ने मला पकडले व खाली पाडुन माझा गळा दाबण्याचा प्रयत्न करीत आसताना मी त्याला ढकलुन दिले. त्यानंतर वरील सर्वानी रिगंन करुन लोंखडी रॉडने हतावर, पायावर मांडीवर मारले.

माझ्या ओळखीचे रमेश वराट हे तेथे आले त्यानी मारहाण करणा-यांच्या तावडीतुन सोडविले. जाताना त्यांनी आमचे नादी लागला तर तुला जीवंत सोडणार नाही असा दम देऊन म्हणून ते निघुन गेले.अशी फिर्याद भूषण मेनकुदळे यांनी दिल्यावरून पोलीसांनी भारतीय न्याय संहितेच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here