जामखेड शहरातील खर्डा चौक ते विश्वक्रांती चौक या राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम चार दिवसांत सुरू न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम पूर्ण करण्याची मुदत अठरा महिन्यांची असताना अडीच वर्षे झाले तरी पंचवीस टक्के काम पूर्ण झाले नाही. अर्धवट रस्ता कुठे खोदून ठेवलेला तर कुठे टाकलेला मुरूम, कुठे खडी तसेच सलग काम न करता कामात धरसोड, हवा तेवढा रस्ता उकरलेला नाही. अर्धवट रस्ता, कुठे गटाराचे काम पूर्ण तर कुठे गटारच नाही. शहरात खर्डा चौक ते विश्वक्रांती चौक अनेक दिवसांपासून रस्ता अपुर्ण आहे यातच बीड काँर्नर ते विश्वक्रांती चौक येथे खडी टाकून ठेवलेली आहे.
वाहनाच्या टायरखाली येऊन दगड उडून अनेक जण गंभीर जखमी झाले आहेत तर अनेक वाहनांच्या काचा फुटलेल्या आहेत. चार दिवसांत जर काम सुरू झाले नाही तर तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनात पांडुरंग भोसले यांनी दिला आहे. निवेदनाच्या प्रति तहसीलदार व पोलीस निरीक्षक जामखेड यांना पाठविल्या आहेत.
जिल्हाधिकारी यांना पाठविलेल्या निवेदनात म्हटले आहे की, गेल्या दोन वर्षांपासून जामखेड शहारातील राष्ट्रीय महामार्गाचे काम रखडलेले असुन या रखडलेल्या कामामुळे जामखेड शहर तालुका व परजिल्ह्यातील येणाऱ्या जाणाऱ्या नागरिकांना अतोनात हाल अपेष्टा सहन कराव्या लागत आहेत.
तसेच या रखडलेल्या कामामुळे अनेक मोटारसायकल चालकांचे अपघात होऊन हात मोडणे, पाय मोडणे,जायबंदी होणे, अशा अनेक घटना दोन वर्षात घडल्या आहेत.
तसेच जून महिन्यात सर्व शाळाविद्यालय सुरु होत आहेत. पावसाळा सुरु झाल्यामुळे रस्त्यावरती चिखलाचे साम्राज्य झाले आहे. रखडलेल्या कामामुळे व हलगर्जीपणामुळे नागरीकांचे व शालेय विद्यार्थ्यांचे प्रचंड हाल होत आहेत. तरी प्रशासनाने तात्काळ अदाज पत्रकानुसार रस्त्याचे काम दिनांक : २९/०५/२०२५ गुरुवार पर्यंत कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल
दरम्यान कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माणझाल्यास यास सर्वस्वी प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात म्हटले आहे.