जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस नाईक अविनाश ढेरे यांचा उत्कृष्ठ कामगिरी बद्दल विशेष सन्मान
जामखेड पोलीस स्टेशनचे गोपनीय विभागाचे पोलीस नाईक अविनाश ढेरे यांना त्यांच्या उत्कृष्ट कामगिरी बद्दल उपविभागीय पोलीस अधिकारीविवेकानंद वाखारे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन विशेष सन्मान करण्यात आला. याबद्दल त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पोलीस नाईक अविनाश ढेरे गोपनीय शाखा हे जवळपास पाच वर्षापासून जामखेड पोलीस स्टेशनला आहेत. त्यांनी आपल्या कामाचा चांगला ठसा उमटवला आहे. पोलीस निरीक्षक महेश पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमात अभिलेख अद्ययावत व चौंडी मंत्रिमंडळ बैठकीतील बंदोबस्तासाठी उत्तम प्रकारे अमंलबजावणी केली याबद्दल प्रशस्तीपत्रक देऊन सन्मानित करण्यात आले.
शासनाच्या शंभर दिवस कृती आराखडा कार्यक्रमात त्यांनी जामखेड पोलीस स्टेशनचे अभिलेख अद्ययावत करण्यात महत्त्वाची जबाबदारी पार पाडली यामुळे पोलीस स्टेशनचे अभिलेख अद्ययावत झाले आहे.
तसेच महाराष्ट्रातील ग्रामीण भागातील पहिलीच कॅबिनेट मंत्रीमंडळ बैठक तालुक्यातील चौंडी येथे संपन्न झाली यात उत्तम प्रकारे बंदोबस्त नियोजन केले.
पोलीस नाईक अविनाश ढेरे यांना उपविभागीय पोलीस अधिकारी विवेकानंद वाखारे यांच्या हस्ते दिलेल्या प्रशस्तीपत्रकात म्हटले आहे की, शंभर दिवस कृती कार्यक्रम अभिलेख अद्ययावत करणे व चौंडी मंत्रिमंडळ बैठकीतील बंदोबस्तासाठी उत्तम प्रकारे अमंलबजावणी केली आपल्या उत्कृष्ठ कामगिरी बद्दल आपल्याला हे प्रशस्तीपत्रक सन्मान पुर्वक प्रदान करण्यात येत आहे. तसेच भविष्यात देखील अशीच कामगिरी करावी याबद्दल शुभेच्छा देण्यात आल्या आहेत.