दहावी परीक्षेचा उद्या आँनलाईन निकाल!!!

0
367

जामखेड न्युज—–

दहावी परीक्षेचा उद्या आँनलाईन निकाल!!! 

दहावी आणि बारावी ही शैक्षणिक आयुष्यातील दोन महत्त्वाचे वर्ष असतात. त्यामुळे ही परीक्षा दिल्यानंतर ती पास होतो की नाही आणि पास झालोच तरी किती गुण मिळतात? याची धाकधूक विद्यार्थ्यांसोबतच पालकांनाही असतेच. नुकताच बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यामुळे दहावीचा निकाल कधी जाहीर होणार? असा प्रश्न सर्वांनाच पडला होता. पण आता महाराष्ट्र शिक्षण मंडळाकडून 10 वीचा निकालाची तारीख जाहीर करण्यात आली आहे. उद्या, मंगळवारी, 13 तारखेला 10 वीचा निकाल जाहीर करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना दुपारी 1 वाजता ऑनलाइन स्वरुपात हा निकाल जाहीर करण्यात येणार आहे.


बारावीचा निकाल लागल्यानंतर बहुप्रतीक्षित अशा दहावीच्या निकालाकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. या निकालाची पालक आणि विद्यार्थी आतुरतेने वाट पाहताना दिसत आहेत. जवळपास सर्वच बोर्डांचे निकाल जाहिर करण्यात आले. मात्र, महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल अजून लागला नाहीये. आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निकाल कधी लागणार, याबद्दल विद्यार्थ्यांकडून विचारणा केली जातेय. दरम्यान याच संदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे.


यंदा १६ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली आहे. या परीक्षेसाठी राज्यातील २३ हजार ४९२ माध्यमिक शाळांमधील विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ लवकरच निकाल जाहीर करणार आहे. इयत्ता दाहावीचा निकाल याच आठवड्यात लागण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती.

त्याचप्रमाणे, दहावीचा निकाल लवकर लागल्यास अकरावीची प्रवेश प्रक्रिया देखील लवकर सुरू होण्याची शक्यता आहे. बोर्डाने अद्याप अधिकृत तारीख जाहीर केलेली नाही. पण, “बारावीच्या निकालानंतर १० दिवसात दहावीचा रिझल्ट जाहीर करु,” असे बोर्डाने यापूर्वी सांगितले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये उत्सुकता होती. ती उत्सुकता संपली आहे. उद्या निकाल जाहीर होणार आहे.

महाराष्ट्र बोर्ड दहावीच्या परीक्षेसाठी बसलेल्या विद्यार्थ्यांनी निकालाच्या लॉगिन विंडोमध्ये आवश्यक लॉगिन तपशील भरणे आवश्यक आहे. एकदा निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी त्यांच्या मार्कशीट्स अधिकृत वेबसाइट mahresult.nic.in द्वारे तपासू आणि डाउनलोड करू शकतात.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here