भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांच्या वतीने जामखेड शहरात मोफत पाणीवाटप सुरू
मना मनाला जपला रे!! संजय काका आपला रे!!
समाजाचे आपण काही तरी देणे लागतो हा उदात्त हेतू डोळयासमोर ठेवत भाजपा शहर मंडलाध्यक्ष संजय काशिद यांच्या वतीने जामखेड शहरात मोफत पाणीवाटप सुरू करण्यात आले आहे. यामुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळाला आहे.
शहराला जाणवत असलेल्या पाणीटंचाईवर मात करण्यासाठी संजय काशिद यांनी टँकरद्वारे मोफत पाणी पुरवठा सेवा सुरू केला सध्या जामखेड शहराला तीव्र पाणीटंचाई सामना करावा लागत असुन पाण्यासाठी नागरिकांना आठ ते दहा दिवस प्रतिक्षा करावी लागत आहे.
महाराष्ट्र राज्याचे महामहीम सभापती प्रा. राम शिंदे यांचे कट्टर समर्थक युवा नेते भाजपा शहर मंडल अध्यक्ष संजय काशिद यांच्या मार्फत जामखेड शहरात मागणी नुसार मोफत पाणी वाटप सुरू केले आहे.
पाण्याची टंचाई असल्यामुळे मागणीला प्रतिसाद देत युवा नेते संजय काका काशिद शहर मंडल अध्यक्ष हे मदतीला पुढे सरसावले आहेत, पाणीटंचाईची झळ काही प्रमाणात कमी व्हावी या प्रमाणिक हेतुने युवा नेते मा. संजय काका जनतेसाठी मोफत पाणी वाटप करत आहेत.
मना मनाला जपला रे संजय काका आपला रे आपला माणूस हक्काचा माणूस असे घोषवाक्य दिसून आले.
उदघाटन प्रसंगी मधुकर आबा राळेभात, प्रविन शेठ चोरडिया, सोमनाथ राळेभात, ॲड प्रविन सानप, तात्याराम पोकळे, पोपट नाना राळेभात, मोहन मामा गडदे, मोहन पवार, मा डॉ विठ्ठल राळेभात, राम पवार, विजय कुलकर्णी, सलिम तांबोळी, प्रा संजय राऊत , पिंटुशेठ केवडे, प्रविण होळकर, बाळासाहेब गायकवाड, विक्रांत घायतडक, शिवकुमार डोंगरे, कल्याण हुलगुंडे,तुषार बोथरा आनंद भैया हुलगुंडे, पै. मनोज गडदे व प्रभाग क्र १८ मधील ग्रामस्त माता भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.