श्री साकेश्वर विद्यालयात भव्य दिव्य बालसंस्कार शिबीर व त्रिदिनी कीर्तन महोत्सव

0
366

जामखेड न्युज——-

श्री साकेश्वर विद्यालयात भव्य दिव्य बालसंस्कार शिबीर व त्रिदिनी कीर्तन महोत्सव

प्रती पंढरपूर म्हणून ओळख असलेल्या साकत येथील श्री साकेश्वर विद्यालयात आज शनिवार दि. १० मे ते शुक्रवार दि ३० मे पर्यंत मुलांवर योग्य संस्कारासाठी भव्य दिव्य बालसंस्कार शिबीर व त्रिदिनी कीर्तन महोत्सवाचे आयोजन केले आहे. तरी या शिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन संयोजक हभप उत्तम महाराज वराट यांनी केले आहे.

सर्व संत सज्जन भाविक भक्तांना कळविण्यात अत्यंत आनंद होतो की, श्रीगुरु वै.ह.भ.प. प. पु. आदरनीय वंदनीय रामचंद्र बोधले महाराज (आबा) व साकेश्वराच्या व ह.भ.प.गु.वै .सिताराम बाबा उंडेगांवकर यांच्या कृपाशिर्वादाने व ह.भ.प. उत्तम महाराज वराट यांच्या मार्गदर्शनाने व साकेश्वराच्या पावन भुमीत भव्य दिव्य बालसुसंस्कार शिबीराचे आयोजन करण्यात आले आहे. आजच्या या धावपळीच्या अधुनिक युगामध्ये समाज जीवनावर पाश्यात्य संस्कृतीचा वाढता प्रभाव, प्रचार माध्यमांचा भडीमार तसेच धावपळीच्या जीवनामध्ये आपल्या पाल्याकडे झालेले आपले दुर्लक्ष यामुळे घरामधील लहान मुले अनेक वाईट प्रवृत्तीकडे प्रवृत्त होताना दिसत आहेत. आणि याचे परिणाम मुले मोठे झाले की त्याची किंमत आई-वडिलांना मोजावी लागते. आणि म्हणुनच आम्ही या बाल सुसंस्कारशिबीराचे आयोजन केले आहे. तरी सर्वांनी या बालसुसंस्कार शिबीराचा लाभ घ्यावा ही नम्र विनंती करण्यात आली आहे.

भौतिक साधनसामग्रीने संपन्न होत असलेले मानवी जीवन, स्वैराचार, तद्वतच मनोविकारता व नैराश्याने ग्रासित झालेले असून २१व्या शतकातील नवीन पिढी कितीही बुद्धिमान व गुणशाली असली तरी त्यांना योग्य संस्कारांची अत्यंत आवश्यकता आहे.

शिबीरातील दिनचर्या
पहाटे ५ ते ६ मृदुंग हार्मोनियम सराव, ६ ते ७ योगासने सराव ७ ते ९ नाष्टा ९ ते १२ गीतपाठ संस्कृत व्याकरण, १२ ते १ भोजन, १ ते ३ विश्रांती, ३ ते ४.३० मृदुंग हार्मोनियम क्लास, ४.३० ते ६ हरीपाठ, ८ ते ९ जेवन हरीभजन नंतर विश्रांती. 

शिबीरातील गणवेश
पांढरा नेहरू शर्ट, पायजमा, धोतर टोपी, ज्यांना जे वाद्य शिकायचे आहे त्यांनी ते वाद्य आणावे, शिबीरातील विद्यार्थ्यांना जेवनासाठी ताट+तांब्या, ब्रश पेस्ट, साबन इ. स्वतः आणावे (त्रिदिनी कीर्तन महोत्सवातील कीर्तन वेळ सायकाळी ७ ते ९ राहील.)

शिबिरात शिकविले जाणारे विषय

स्वावलंबी जीवन, वारकरी भजन, पखवाज / तबला, हार्मोनियम, संत चरित्र, विविध खेळ, श्रीमत भगवतगीता, हरीपाठ पावल्या शिबीराचे ठिकाण श्री साकेश्वर विद्यालय साकत १० मे ते ३० मे २०२५ पर्यंत.

कृपाशीर्वाद पंडित केशवराव महाराज जगदाळे गुरूजी, संयोजक हभप उत्तम महाराज वराट, मृदंगाचार्य उत्तरेश्वर महाराज वराट व बाजीराव महाराज वराट आहेत.

शिबीरात सहभागी होण्यासाठी संपर्क क्रमांक
9552072354
9763644554
9370583362

चौकट
१० जून पासुन शालेय शिक्षणासोबत वारकरी शिक्षणाची सुवर्ण संधी इ. ३ री १२ वी पर्यंत नर्मदेश्वर वारकरी गुरूकुला मध्ये प्रवेश देणे चालु आहे.पत्ता : श्री नर्मदेश्वर वारकरी गुरूकुल, अकोळनेर, ता. जि. अहिल्यानगर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here