सरपंच मंगेश साबळे यांचे भिकाऱ्याच्या वेशात भीक मागत अनोखे आंदोलन तोंडावर चिखल, फाटके कपडे, गळ्यात बुट अन्– भिकेसाठी नागरिकांना साद

0
851

जामखेड न्युज——-

सरपंच मंगेश साबळे यांचे भिकाऱ्याच्या वेशात भीक मागत अनोखे आंदोलन

तोंडावर चिखल, फाटके कपडे, गळ्यात बुट अन्– भिकेसाठी नागरिकांना साद

पंचायत समिती कार्यालय अंतर्गत असणाऱ्या घरकुल योजनेत इंजिनिअर व अधिकारी पैशाची मागणी करत असल्याने तालुक्यातील गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी भिकाऱ्याचे सोंग घेऊन पंचायत समिती कार्यालया समोर गुरुवारी दि. ८ रोजी अनोखे आंदोलन करत सर्वांचेच लक्ष वेधून घेतले. त्यांच्या या अनोख्या आंदोलनाने जाणाऱ्या – येणाऱ्या नागरिकांनी भिकारी समजून भीक दिल्याचा प्रकार दिसून

विभागीय आयुक्ताच्या नावाने भीक मागत मंगेश साबळे या सरपंचाने फुलंब्री तहसील ऑफीस, पंचायत समिती आणि पोलिस चौकी बाहेर अनोखे आंदोलन केले आहे. विविध योजनेतील लाभार्थी अनुदानापासून वंचित आहेत, त्यांना तत्काळ रक्कम द्यावी, घरकुलसाठी पैसे मागणाऱ्या अभियंत्याला पैसे देण्यासाठी आपण भीक मागो आंदोलन करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.


मंगेश साबळे म्हणाले की, फुलंब्री पंचायत समिती मार्फत राबविल्या जाणाऱ्या वैयक्तिक सिंचन विहीर, गाय गोठा, घरकुल योजनाच्या कामाचे पैसे मागील सहा महिन्यापासून मिळत नसल्याने शेतकरी, लाभार्थी आर्थिक अडचणीत आले आहेत. त्यांना तत्काळ पैसे देण्यात यावे. जमा झालेली रक्कम आणि आत्महत्या केलेल्या शेतकऱ्याची राख घेऊन ते बीडीओं सह विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, इंजिनिअर, एसपी यांना देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

साबळेची भिकेसाठी नागरिकांना साद

• विभागीय आयुक्तच्या नावाने दे..ग..माय.!• जिल्हाधिकाऱ्याच्या नावाने दे ग माय.!
सीईओच्या नावाने दे ग माय.!•
बीडिओ च्या नावाने दे ग माय.!•
घरकुल इंजिनीयरच्या नावाने दे ग माय.!

अनोख्या आंदोलनामुळे असतात चर्चेत

आपल्या अनोख्या आंदोलनामुळे सरपंच मंगेश साबळे हे नेहमी चर्चेत असतात. फाटलेले कपडे, तुटक्या चपल्या, पाठीवर बांधलेली खूर्ची पाहूण आपण त्यांना एकादा भाकारी समजू पण हे फुलंब्रीमधील सरपंच मंगेश साबळे आहेत. जे आपल्या अनोख्या आंदोलनासाठी प्रसिद्ध आहेत. कधी महिलांच्या वेशात पाण्यासाठी जिल्हा परिषदेत, तर कधी सुटे पैसे घेऊन कार्यालयात गेल्याने त्यांची नेहमी चर्चा होत असते. मराठा आरक्षणाच्या आंदोलनावेळी त्यांनी आपली कार जाळली होती. तेव्हापासून ते चर्चेमध्ये आले आहेत.


घरकुलासाठी केले होते वर्षभरापूर्वी आंदोलन

वर्षभरापूर्वी गेवराई पायगाचे सरपंच मंगेश साबळे यांनी आमच्या गावाने शंभर टक्के कराचा भरणा केला आहे. घरकुल मिळावे, यासाठी अर्ज केले आहेत. तरी घरकुल मिळत नसल्याचा आरोप करत आंदोलन केले होते. त्यावेळी त्यांनी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा कार्यालय बिनकामाचे असून येथून काय विकास होतो, काय विकास केला ते तरी कुणी सांगा, असे ओपन आव्हान साबळे यांनी दिले. भ्रष्टाचारचा भस्मासुरू झाल्याचेही त्यांनी म्हटले आहे. मागील महिन्यात चक्क साडी नेसून आंदोलन केलं होते.

चौकट

फुलंब्री पंचायत समिती अंतर्गत असणाऱ्या घरकुल योजनेत असणारे इंजिनियर ग्रामीण भागात शेतकऱ्यांच्या घरकुलाचा फोटो काढत्या वेळी पैशाची मागणी करतात. पैसे दिले तर त्यांचा हप्ता वितरित होतो. पैसे दिले नाही तर घरकुलाचे पैसे मिळत नाही. अंगणवाडी भरतीतही पैशाची मागणी झाली. त्यामुळे पैसे मागणाऱ्या अधिकाऱ्यांना पैसे देण्यासाठी हे अनोखे भिक मागो आंदोलन करावे लागले.

मंगेश साबळे, सरपंच गेवराई पायगा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here