संतोष देशमुखांच्या जिद्दी लेकीनं आपल्या ‘गुणां’नी महाराष्ट्राला जिंकलं!
मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या करण्यात आली. आपल्या वडिलांना न्याय मिळावा यासाठी संतोष देशमुख यांची कन्या वैभवी देशमुख हिने महाराष्ट्रभर आंदोलन केले. नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या.
वैभवीचे हे बारावीचे वर्ष होते. त्यामुळे डिसेंबरपासून वडिलांना न्याय मिळावा यासाठी फिरणाऱ्या वैभवीची परीक्षेत कामगिरी कशी असणार याची उत्सुकता होती. वैभवीने आपल्या गुणांनी सगळ्यांना चकीत केले. बारावीमध्ये तिला तब्बल तिला 85.33 टक्के गुण मिळवले आहेत.
संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांना न्याय मिळावा यासाठी आपले चुलते धनंजय देशमुख यांच्यासोबत वैभवी महाराष्ट्रभर फिरत होती. नेत्यांच्या गाठीभाठी घेत त्यांना आपल्याला न्याय देण्याची विनंती करत होती. डिसेंबरमध्ये तिच्या वडिलांच्या हत्या झाली तेव्हापासून ती न्याय मागत होती.
आंदोलन करत होती. या काळात तिचा नीटसा अभ्यासही झाला नाही. तिनेचे एका मुलाखतीमध्ये सांगितले होते की तिचा अभ्यासात मनच लागत नाही. पावलोपावली आपल्या वडिलांची आठवण येत आहे.
वैभवी देशमुख हिने परीक्षेच्या आधी मला या कठीण परिस्थितीमध्ये देखील परीक्षा द्यायची आहे आणि नीट देखील पास करायची आहे असे म्हटले होते. आपले मन अभ्यासात लागत नाही. पावलोपावली माझ्या वडिलांची आठवण येत होती. ते दुखः आम्ही वारंवार सांगतोय. आमच्या कुटुंबात गावात पूर्ण दुःख आहे. या दु:खातून सावरू शकत नसल्याचे देखील तिने म्हटले होते.
बारावीचा निकाल 91 टक्के यंदा बारावीचा निकाल तब्बल 91 टक्के लागला आहे. या निकालामध्ये कोकण विभागाने बाजी मारली आहे. कोकण विभागाचा निकाल तब्बल 96.74 टक्के लागला आहे. यंदाच्या निकालात देखील मुलींनी बाजी मारली आहे.
स्व.एम.ई.भोरे ज्यु. कॉलेज पाडळी, जामखेड जि अहिल्यानगर ची विध्यार्थीनी वैभवी संतोष देशमुख हिचा सत्कार संस्थापक अध्यक्ष डॉ. संजय भोरे व प्राचार्या अस्मिता जोगदंड – भोरे सत्कार केला. तिने12 वी परीक्षेत 85.33% गुण मिळवून दुसरा क्रमांक पटकावला.