तालुक्यातील शैक्षणिक दृष्ट्या अग्रेसर असलेल्या ल. ना. होशिंग माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे.
आज जाहीर झालेल्या बारावीच्या परीक्षेत विज्ञान शाखेचा 94.82 टक्के निकाल लागला आहे तर कला शाखेचा 72.84 टक्के वाणिज्य शाखेचा 97.82 टक्के निकाल लागला आहे.
विज्ञान शाखेचा निकाल 94.82 टक्के लागलेला आहे यातील प्रथम तीन क्रमांक कु. कुलकर्णी अनघा वैभव 88.83 टक्के गुण घेत प्रथम क्रमांक पटकावला तर चि. चव्हाण पार्थ शिवाजी याने 83.33 टक्के गुण मिळवून द्वितीय क्रमांक पटकावला तर कु. काशिद संध्या सदगुरू हिने 81.83 टक्के गुण मिळवून तृतीय क्रमांक पटकावला.
कला शाखेचा निकाल 72.84 टक्के लागला प्रथम क्रमांक – कु. हराळ रेणुका प्रकाश – 82.67 द्वितीय क्रमांक- कु. राऊत नेहा शिवाजी – 80.17 तृतीय क्रमांक – कु. पठाण जोया जुबेर – 70.83
वाणिज्य शाखेचा निकाल 97.82 टक्के लागलेला आहे. यातील पहिले तीन विद्यार्थी प्रथम क्रमांक-कु.धांडे प्रांजली सोमिनाथ 86.17 टक्के द्वितीय क्रमांक – चि. भालेराव तेजस संदिपान 78.00 टक्के तृतीय क्रमांक – कु. गाडेकर वैष्णवी सुनील 76.00 टक्के
अशा प्रकारे ल. ना. होशिंग विद्यालयाने बारावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन संस्थेचे अध्यक्ष उद्धवबापू देशमुख, उपाध्यक्ष अरूणशेठ चिंतामणी, सचिव शशिकांत देशमुख, सहसचिव दिलीप गुगळे, खजिनदार राजेश मोरे सह सर्व संचालक मंडळ तसेच प्राचार्य बी. ए. पारखे, उपप्राचार्य सादिक शेख यांच्या सह सर्व प्राध्यापक यांनी अभिनंदन केले आहे.