जामखेडमध्ये दाखल्यासाठी विद्यार्थी व पालकांची सेतू कार्यालयात झुंबड, सध्या एकाच मशीनवर लाँगइन
जास्त मशीनवर लाँगइन ला परवानगी द्यावी
जामखेड मध्ये तालुका सेतू कार्यालयात वेगवेगळ्या दाखल्यासाठी जास्त मशिनला परवानगी द्यावी,एकाच मशीनवर लाँग इन होत असल्याने दाखल्यास विलंब होत आहे सेतू कार्यालयात विद्यार्थी व पालकांची झुंबड उडाली आहे. काही दिवसात दहावी व बारावीचा निकाल लागेल मग तर आणखी जास्त गर्दी होणार आहे.
सध्या वेगवेगळ्या ठिकाणी प्रवेश प्रक्रियेसाठी वेगवेगळे दाखले हवे असतात. यासाठी विद्यार्थी पालक मोठ्या प्रमाणात सेतू कार्यालयात दाखले काढण्यासाठी येतात पण सेतू कार्यालयात एकच मशीनवर लाँग इन होत असल्याने दाखल झालेले दाखले होत नाहीत. सरासरीने दिडशेच्या आसपास दाखले दाखल होतात पण एकाच मशीनवर पन्नास च्या आसपास दाखले तयार होतात. यामुळे तालुका सेतू कार्यालयात जास्त मशीनवर लाँग इन साठी परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे.
जामखेड तालुक्यात सध्या तीन सेतू कार्यालये आहेत. वेगवेगळ्या प्रवेश परिक्षेसाठी अनेक दाखले हवे असतात यासाठी सेतू कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी दिसून येत आहे. एकाच मशीनवर लाँग इन होत असल्याने मशीनवर मोठ्या प्रमाणावर लोड येत आहे यामुळे विद्यार्थ्यांना पालकांना दररोज चकरा माराव्या लागतात.
वेगवेगळ्या प्रवेश प्रक्रियेसाठी प्रतिज्ञापत्र, उत्पन्न दाखला, जात प्रमाणपत्र, राष्ट्रीयत्व, रहिवास प्रमाणपत्र, ईडब्लूएस प्रमाणपत्र, शेतकरी प्रमाणपत्र, नाँनक्रिमेलीअर या सह अनेक दाखले लागतात. एका मशीनवर पन्नास च्या आसपास दाखले होतात तालुक्यातून दिडशे ते दोनशे दाखल्यासाठी लोक येतात. पण फक्त पन्नास च्या आसपास दाखले तयार होतात. यामुळे तालुका सेतू कार्यालयात जास्त मशिनला परवानगी द्यावी अशी मागणी होत आहे.
सध्या प्रवेश प्रक्रियेसाठी अनेक दाखले लागत आहेत. परंतु सेतू कार्यालयात एकाच मशीनवर लाँग इन होत असल्याने एका मशीनवर मोठ्या प्रमाणात लोड येत आहे. फक्त पन्नास च्या आसपास दाखले तयार होतात यामुळे मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. विद्यार्थी व पालकांना हेलपाटे मारावे लागतात.
बिलंबामुळे विद्यार्थी व नागरिकांना हेलपाटे मारावे लागतात. सध्या तालुका सेतू कार्यालयात मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. गाव पातळीवर अनेक ग्रामपंचायतीचे लाँगइन पण बंद केलेले आहे.