जामखेड शहरात पाणीबाणी, दहा ते अकरा दिवसांनंतर पाणी, सतत पाईपलाईन फुटून लाखो लीटर पाणी वाया कोणतीही निवडणूक नसल्याने मोफत पाणी टँकर गायब

0
516

जामखेड न्युज—–

जामखेड शहरात पाणीबाणी, दहा ते अकरा दिवसांनंतर पाणी, सतत पाईपलाईन फुटून लाखो लीटर पाणी वाया

कोणतीही निवडणूक नसल्याने मोफत पाणी टँकर गायब

एकेकाळी चोवीस तास पाणीपुरवठा होणारे शहर म्हणूनजामखेड शहराला सध्या भुतवडा धरणातून पाणीपुरवठा होत आहे. सरासरी आठ दिवसातून एकदा पाणी होत आहे. सध्या धरणातही चांगला पाणीसाठा आहे तरीही शहरातील अनेक भागात दहा दिवस झाले तरी पाणी नाही यामुळे परिसरातील नागरिकांना पाणीटंचाईचा सामना करावा लागत आहे. उजणी धरणातून कधी पाणी योजना पुर्ण होते व दररोज पाणी मिळते याची प्रतिक्षा जामखेड वासियांना लागली आहे सध्या तरी शहरात पाणीबाणी सुरू आहे. सध्या कोणतीही निवडणूक नसल्याने सामाजिक कार्यकर्त्यांचे मोफत पाणी टँकर गायब आहेत.

जामखेड शहराच्या पाणीपुरवठ्यासाठी
तत्कालीन पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांनी नगरविकास खात्याकडे मागणी केली होती. हीच मागणी लक्षात घेत माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसयांनी दहिगाव (उजनी ) येथून ६४ किमी लांब आसलेली १७९. ९८ कोटी रुपयांची महाराष्ट्र सुवर्णजयंती नगोत्थान महाअभियाना अंतर्गत ही पाणीपुरवठा योजना मंजूर दिली होती. मात्र नंतर हीयोजना अडगळीत पडल्यासारखी झाली होती. यानंतर आमदार रोहित पवार यांनी या योजनेचा पाठपुरावा करून तांत्रिक मान्यता, सुधारित तांत्रिकमान्यता, प्रशासकीय मान्यता आणि प्रत्यक्ष निधी मिळवणे ही सर्व कामे केली.


दहिगाव ते जामखेड ६४ किमीची योजना करमाळा तालुक्यातील दहिगाव ते जामखेड अशी ६४ किमी अंतर असलेली ही पाणीपुरवठा योजना आहे. दहिगाव येथील उजनी बॅकवॉटर मधून ३५० एच.पी मोटारने पाणी उपसा करून करमाळा या ठिकाणी आणण्यात येणार आहे. करमाळा येथन जवळा नान्नज मार्गे ग्रॅव्हिटीने हे पाणी जामखेड जवळील चुंबळी या ठिकाणी बंद पाईपलाईन द्वारे आणण्यात येणार आहे. यानंतर चुंबळी या ठिकाणी जलशुद्धीकरण केंद्र तयार करून नंतर पुढे पाईपलाईन द्वारे शहरात व उपनगरात अंडरग्राउंड नवीन पाईपलाईन टाकून नागरिकांना दररोज पाणीपुरवठा करण्यात येणार आहे.


जामखेड शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या पाईपलाइन सतत फुटत असल्याने शहराला दहा ते अकरा दिवसाला पाणी मिळत आहे त्यामुळे लोकांचे पाण्यासाठी मोठे हाल होत आहेत याकडे लक्ष देण्यासाठी दोन्ही लोकप्रतिनिधींना वेळ नाही अशी परिस्थिती निर्माण झाली आहे.


जामखेड शहरासाठी १९७२ ला पाणीपुरवठा योजना तयार झाली आणि ती १९७५ ला कार्यान्वित करण्यात आली आहे त्यावेळेस २०११ ला लोकसंख्या ३९५५१ एवढी होती आता २०२५ ला लोकसंख्या अंदाजे ५०००० एवढी झाली आहे त्यामुळे लोकसंख्या वाढली पण पाणी पुरवठा योजना जुनीच आहे त्यामुळे पाण्याचे रोटेशन बिघडत चालले आहे तसेच ग्रामपंचायत काळातील पाईप लाईन असल्याने पाईप ची मुदत संपली असुन सदर पाईप कंपनी देखील बंद झाली आहे.


मग पाईप लाईन फुटली तरी पाईप कुठुन आणणार हा प्रश्न गंभीर बनला आहे सध्या नवीन पाणीपुरवठा योजनांचे काम थिम्यागतीने सुरू आहे काम करतांना सदर ठेकेदारा कडुन अनेकदा जुनी पाईप लाईन फोडली आहे त्यामुळे आठ दिवसांत चार वेळा पाईपलाइन फुटली आहे त्यामुळे पाणी रोटेशन बिघडत आहे तसेच शेतीचे कामे सुरू असून काम करतांना पाईप सतत फुटत असल्याने पाणी पुरवठा करणाऱ्या कमँचार्याचे देखील नाकीनऊ आले आहे सध्या भुतवडा गावात अनेकदा पाईप लाईन फुटत आहे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here