जामखेड येथील शासकीय निवासी मुलांच्या शाळेतरॅगिंगचा प्रकार, सहाय्यक आयुक्त यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती
जामखेड शहरातील अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलांची शासकीय निवासी शाळा येथे सोमवारी दि. २१ रोजी दुपारी आठवीच्या मुलाला नववीच्या मुलांनी मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ काल मंगळवारी सर्वत्र व्हायरल झाला. यामुळे सर्वत्र एकच खळबळ उडाली आहे. प्राचार्य शोभा कांबळे यांनी झालेला प्रकार ताबडतोब जामखेड पोलीसांना कळवला आहे. हा रॅगिंगचा प्रकार असल्याचे बोलले जात आहे. याबाबत अद्याप पर्यंत कोणीही पालकांनी पोलीस स्टेशनला तक्रार दाखल केलेली नाही.
या प्रकाराबाबत संपूर्ण राज्यात एकच खळबळ उडाली आहे. जिल्हा स्तरावरील सहाय्यक आयुक्त प्रविण कोरगंठेवार यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. आज दिवसभर ते निवासी शाळेत येऊन सविस्तर चौकशी करत होते त्यांचा अहवाल रात्री उशिरा किंवा उद्या प्राप्त होईल. अशी शक्यता आहे. मारहाण केलेल्या मुलांच्या वडिलांना बोलवले आहे. सविस्तर चौकशी सुरू आहे. जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक महेश पाटील यांनी तातडीने वसतीगृहाला भेट दिली आहे.
जिल्हा स्तरावर चौकशी समिती स्थापन करण्यात आली असुन समिती मार्फत चौकशी करण्यासाठी पथक वसतीगृहात दखल झाले यावेळी शिवप्रतिष्ठान हिंदूस्थानचे पांडुरंग भोसले. मनसेचे प्रदिप टापरे, गणेश काळे, पांडुरंग माने, आमदार रोहित पवार यांचे स्विय सहायक अभिजीत उगमुगले, यांच्या सह अनेक ग्रामस्थ उपस्थित होते.
याबाबत निवासी शाळेच्या मुख्याध्यापिका शोभा कांबळे म्हणाल्या की, सध्या शाळा सकाळी होती दुपारी सुट्टी होती. आमच्या एका शिक्षकाची ड्युटी होती. मुले आप आपल्या खोलीत गेले व आठवीच्या मुलाला नववीच्या मुलांनी मारहाण केली. खोली बंद असल्याने आवाज आला नाही. आम्हाला ही घटना माहिती झाली तेव्हा आम्ही लगेच मुलांच्या वडिलांना बोलावले सर्व मुले अल्पवयीन असल्याने तसेच मुलांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून कोणीही पालक गुन्हा दाखल करण्यास तयार नव्हते. मारहाण करणारा मुलगा निवासी शाळेतून निलंबित करण्यात येईल अशी माहिती मिळाली.
निवासी शाळा ही सहावी ते दहावी पर्यंत शाळा आहे. एकुण 83 विद्यार्थी आहेत. तसेच सहा शिक्षक आहेत. सध्या रेक्टर पद रिक्त आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. सहायक आयुक्त प्रविण कोरगंठेवार यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. त्यांचा अहवाल आल्यावर कोणावर काय कारवाई होईल हे समजणार आहे.