Wednesday, February 11, 2026
Home ताज्या बातम्या ग्रामसेवकाने निलंबित काळात काढले बारा लाखांचे बील सखोल चौकशी करून फौजदारी...

ग्रामसेवकाने निलंबित काळात काढले बारा लाखांचे बील सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करा – महादेव वराट

0
1534

जामखेड न्युज—–

ग्रामसेवकाने निलंबित काळात काढले बारा लाखांचे बील

सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करा – महादेव वराट

जामखेड तालुक्यातील जायभायवाडी येथील जीवंत व्यक्तीला मयत दाखवले होते. यामुळे ग्रामस्थांनी जामखेड तहसील कार्यालयासमोर तीन दिवस उपोषण केले होते. तेव्हा प्रशासनाने कठोर कारवाई करत संबंधित ग्रामसेवक राजेंद्र वळेकर यांच्या निलंबनाचे आदेश काढला होता.

या ग्रामसेवकाने साकत ग्रामपंचायत चाही चार्ज होता. जायभायवाडी प्रकरणात ते निलंबित झाले तरीही या ग्रामसेवकाने साकत ग्रामपंचायत मध्ये बारा लाखांपेक्षा जास्त कामाचे बील काढले आहे. आता परत ग्रामसेवकावर काय कारवाई होते याकडे लोकांचे लक्ष लागले आहे.

निलंबित असतानाही साकत ग्रामपंचायत मध्ये सुमारे बारा लाख रुपये संबंधित ग्रामसेवकाने काढले यामुळे साकत येथील महादेव वराट यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी अहिल्यानगर यांना निवेदन देत संबंधित ग्रामसेवकाची सखोल चौकशी करून फौजदारी गुन्हा दाखल करावा व दोषी ग्रामसेवकास कायमस्वरूपी निलंबित करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा महादेव वराट यांनी दिला आहे.


महादेव वराट यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिलेल्या निवेदन म्हटले आहे की, २६/०३/२०२५ रोजी मुख्यकार्याकारी अधिकारी आशिष येरेकर यांनी दोषी ग्रामसेवक राजेंद्र वळेकर च्या निलंबनाचा आदेश काढला. संबंधित ग्रामसेवक यांचेकडे साकत ग्रामपंचायत चा कार्यभार होता. त्यांनी निलंबनाच्या काळात मोठया प्रमाणावर अपाहार केला आहे. २९/०३/२०२५ रोजी ८,३९,०००/- रुपये तर ०४/०४/२०२५ रोजी४,००,०००/- रुपये. अशी व इतर काही प्रमाणात अपहार आढळून आला आहे.


तरी निलंबित काळात अधिकार नसताना असे अनेक अपहार केलेले आहेत.तरी याची आठ दिवसात चौकशी करुन फौजदारी गुन्हा दाखल करुन कायम स्वरुपी निलंबित करावे अन्यथा तीव्र स्वरुपाचे अमरण उपोषक करण्यात येईल याची नोंद घ्यावी.

चौकट
याबाबत निलंबित ग्रामसेवक राजेंद्र वळेकर यांच्याशी संपर्क केला असता ते म्हणाले की, माझ्या निलंबणाच्या आगोदर साकत ग्रामपंचायत मध्ये काही कामे झालेली होती त्यांची बील देणे बाकी होते. म्हणून पैसे काढले व बील दिले आहे. तसेच साकत ग्रामपंचायत चा चार्ज दि. २१ एप्रिल रोजी मी दिलेला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!