जामखेड तालुक्यातील ५८ ग्रामपंचायतचे सरपंच पदाचे आरक्षण जाहीर, पहा कोणत्या गावात कोणते आरक्षण
आज दिनांक २३/०४/२०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता तहसिल कार्यालय, जामखेड जिल्हा अहिल्यानगर येथे मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ मधील कलम ३० व मुंबई ग्रामपंचायत सरपंच व उपसरपंच निवडणूक नियम १९६४ मधील नियम २ अ पोट नियम (३), (४), (५) व (६) मधील तरतुदींनुसार अनुसुचित जाती, अनुसुचित जमाती, नागरीकांचा मागास प्रवर्गातील सरपंचाची पदे तसेच सर्वसाधारण जागा आरक्षित करावयाची कार्यवाही चक्रानुक्रमे व सोडत पध्दतीने (चिठठ्या टाकून) आरक्षित करण्यात आली.
जामखेड तालुक्यात एकूण ५८ ग्रामपंचायतीचे सरपंच पदाची सन २०२५ – २०३० करीता आरक्षित केलेल्या सदरग्रामपंचायत यांचे महिला आरक्षण दि. २४/०४/२०२५ रोजी सकाळी ११.०० वा. मा. उपविभागीय अधिकारी कर्जत यांचे अध्यक्षतेखाली निश्चित करण्यत येईल.
जामखेड तालुक्यातील एकुण ५८ ग्रामपंचायतीपैकी सहा ग्रामपंचायतीमध्ये अनुसूचित जाती साठी तर एक ग्रामपंचायत अनुसूचित जमातीसाठी आरक्षण जाहीर करण्यात आले आहे. तर सोळा ग्रामपंचायत मध्ये नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी तर ३५ ग्रामपंचायत सर्व साधारण प्रवर्गासाठी आहेत महिला आरक्षण उद्या जाहीर करण्यात येईल.
अनुसूचित जाती (एसी)साठी आरक्षित झालेल्या सहा ग्रामपंचायत पुढील प्रमाणे
शिऊर दिघोळ पाटोदा साकत वाघा जातेगांव
अनुसूचित जमातीसाठी एसटी साठी एक ग्रामपंचायत पुढील प्रमाणे पिंपरखेड
नागरिकांचा मागास प्रवर्ग (ओबीसी) साठी सोळा आरक्षित ग्रामपंचायत पुढील प्रमाणे आहेत.