आयकॉन प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेत एम.जे. नाईट राईडर्स विजेता सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
आयकॉन प्रिमीयर लीग क्रिकेट स्पर्धेत एम.जे. नाईट राईडर्स विजेता
सामाजिक कार्यकर्ते निलेश गायवळ यांच्या वाढदिवसानिमित्त डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे पारितोषिक वितरण संपन्न
गेल्या पाच दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते निलेश (भाऊ) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या आयकॉन प्रिमीयर लीग डे नाईट क्रिकेट स्पर्धेत जमीरभाई सय्यद यांच्या एम.जे. नाईट राईडर्स या संघाने प्रथम क्रमांकाचे 61 हजार रूपयांचे पारितोषिक पटकावले. तर द्वितीय मेजर ११ जायभायवाडी, तृतीय सोनपरी टायटन व चतुर्थ आर्यन ट्राइकर्स यांनी पटकावले.
सामाजिक कार्यकर्ते निलेश (भाऊ) यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित तालुक्यात प्रथमचशंभूराजे क्रिकेट क्लब मैदान बीड रोड येथे डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे दि. १८ एप्रिल ते २२ एप्रिल असे पाच दिवस क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेत एकूण आठ संघ उतरले होते. मंगळवार दि. २२ रोजी झालेल्या सामन्यात जमीरभाई सय्यद यांच्या एम.जे. नाईट राईडर्स या संघाने प्रथम क्रमांकाचे 61 हजार रूपयांचे पारितोषिक पटकावले. हे पारितोषिक तुषार डुचे व महासंग्राम युवा मंचच्या वतीने देण्यात आले होते.
द्वितीय संघाचे संघ मालक मेजर अशोक मुंडे, संदीप ठोंबरे, अँड अमोल जगताप यांच्या मेजर इलेव्हन संघाने 51 हजाराचे द्वितीय पारितोषिक पटकावले हे पारितोषिक तुषार डुचे यांच्या वतीने देण्यात आले. तृतीय क्रमांकाचे संघ मालक अँड घनश्याम राळेभात व संजय डोके यांच्या सोनपरी टायटन्स या संघाने 31 हजाराचे पारितोषिक पटकावले अनिकेत बांदल यांच्या वतीने देण्यात आले. चतुर्थ क्रमांकाचे संघ मालक डॉ. सुशील पन्हाळकर व आबेद जमादार यांच्या आर्यन ट्राइकर्स संघाने 25 हजाराचे पारितोषिक पटकावले उद्योजक आकाश बाफना यांच्या वतीने देण्यात आले.
या स्पर्धेत मँन आँफ सिरीज मुनाफ शेख यांना नदिम शेख यांच्या वतीने 43 इंची एलसीडी टिव्ही बक्षीस म्हणून देण्यात आले. उत्कृष्ट फलंदाज म्हणून अरमान शेख यांना लखन भुतकर शौर्य लाईट हाऊस यांच्या वतीने 32 इंची एलसीडी टिव्ही तर उत्कृष्ट गोलंदाज म्हणून विठ्ठल डोके यांना माऊली निमोणकर यांच्या तर्फे 32 इंची एलसीडी टिव्ही देण्यात आले.
या स्पर्धेसाठी विजेत्या चार संघाना सामाजिक कार्यकर्ते निलेश (भाऊ) गायवळ व विविध मान्यवरांच्या हस्ते आयकॉन प्रिमीयर लीग चषक विजेत्या संघाना देण्यात आले. यावेळी कार्यक्रमा दरम्यान सामाजिक कार्यकर्ते निलेश (भाऊ) गायवळ, प्रा. मधुकर (आबा) राळेभात, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका अध्यक्ष महेश (दादा) निमोणकर, मनसे तालुका अध्यक्ष प्रदीप टापरे, जानकीमामा गायकवाड, नगरसेवक अमित चिंतामणी, राष्ट्रवादी काँग्रेसचे गणेश काळे, हवाशेठ सरनोबत, डॉ. निखिल वारे, डॉ विकी दळवी डॉ. सादेक पठाण, ॲड. प्रवीण सानप, राजू ओव्हळ, गुलशन अंधारे, गणेश आजबे, दिगंबर चव्हाण, सुंदरदास बिरंगळ, काका गर्जे, प्रवीण फलके, केदार रसाळ, सुरज पवार, संतोष गव्हाळे, भरत जगदाळे, अनिल बाबर, तुषार डुचे, उद्धव हुलगुंडे, ऋषिकेश गायकवाड, रामदास निमोणकर तसेच महासंग्राम युवा मंचाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी एस एस डेकोरेशन शिवराज राळेभात, जहीर ट्रेडर्स, कृष्णा पोकळे, शुभम राळेभात आय लव कर्जत जामखेड, व ओम साई ट्रेडर्स व आदर्शवाद कलेक्शन यांनी विषेश सहकार्य केले. या कार्यक्रमासाठी आयोजक ॲड. अमोल जगताप, अजय कोल्हे, मुनाफ शेख, शिवराज विटकर, सागर आमले, तुषार म्हेत्रे, अमीर शेख, यांनी महासंग्राम युवा मंच, जामखेड व निलेश (भाऊ) गायवळ मित्र मंडळाच्या वतीने खास परिश्रम घेण्यात आले.
सदरच्या डे नाईट क्रिकेट स्पर्धेचे जामखेड तालुक्यात प्रथमच आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचे नियोजन खुपच छान पद्धतीने करण्यात आले होते. या स्पर्धेचा हजारो प्रेक्षकांनी लाभ घेतला. या स्पर्धेची चर्चा जामखेड परिसरात जोरात सुरू आहे. या स्पर्धेचे समालोचन अनिल बेलोटे तर पंच म्हणून निवृत्ती पते, विजय वाघरी यांनी काम पाहिले. व प्रेक्षकांचे खुपच मनोरंजन केले.