काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा जामखेड मध्ये पाकिस्तानी ध्वज जाळून जाहीर निषेध

0
550

जामखेड न्युज—–

काश्मीरमधील पहलगाम हल्ल्याचा जामखेड मध्ये पाकिस्तानी ध्वज जाळून जाहीर निषेध

भारताचं नंदनवन समजल्या जाणाऱ्या काश्मीरमधील पहलगाम पर्यटकांच्या रक्ताच्या सड्याने लाल झाला आहे. दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात आतापर्यंत 28 जण मृत्युमुखी पडले आहेत. निष्पाप हिंदुवर काल दि 22 एप्रिल रोजी झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सकल हिंदु समाजाच्या वतीने आज दि २३ एप्रिल २०२५ रोजी सायंकाळी शहरातील खर्डा चौक या ठिकाणी पाकिस्तानचा ध्वज जाळुन पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत जाहीर निषेध करण्यात आला.

यावेळी अजय काशिद, शिवनेरी अकॅडमी चे कॅप्टन लक्ष्मण भोरे, अमित चिंतामणी, पांडुराजे भोसले व प्रदीप टाफरे यांनी आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या. त्यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे निष्पाप हिंदुवर दहशतवाद्यांनी हल्ला करुन गोळ्या घालून ठार मारले आहे. यावेळी दहशतवाद्यांनी तुम्ही हिंदु आहात का? असे विचारुन अनेकांना ठार मारले आहे. याहल्ल्यात अनेक जण जखमी झाले आहेत. दिवसेंदिवस कट्टर धर्माध वाढत चालला आहे.

कश्मीर मध्ये येऊन हल्ला करुन दहशतवाद्यांनी व्हिडिओ व्हायरल केले आपल्याच भारतीय सैनिकांचा ड्रेसकोट घालून भारतात प्रवेश करुन दहशतवादी हल्ले करत आहेत यानां वेळीच आवर घालणे हि केंद्र सरकारची जबाबदारी आहे.

पहलगाम मध्ये घडलेली घटना ही देशाला काळीमा फासणारी आहे. धर्म विचारुन गोळ्या घातल्या जात आहेत अशा घटना मानवतेला कलंक आहे. पुलवामा हल्लाला सर्जिकल स्ट्राईक ने उत्तर दिले तसेच उत्तर यावेळी देखील देणे गरजेचे आहे आणि हीच खरी हल्ल्यात मृत्यू झालेल्या बांधवाना श्रध्दांजली ठरेल. जम्मू आणि काश्मीर हा भाग भारताचा स्वर्ग मानला जातो आणि आसे दहशतवादी हल्ले वारंवार घडत राहीले तर याचा नरक व्हायला वेळ लागणार नाही असे सांगितले. यानंतर आशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी केंद्र सरकारने कठोर पावले उचलुन दहशत वाद्यांचा बिमोड करवा जेने करुन आशा घटना घडणार नाहीत आशी मागणी करण्यात आली. या नंतर या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली.

यावेळी भाजपा शहराध्यक्ष संजय काशिद, अमित चिंतामणी, अजय काशीद, राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष महेश निमोणकर, कॅप्टन लक्ष्मण भोरे, प्रदिप टापरे, पांडुराजे भोसले, अभिजित राळेभात, लक्ष्मण कानडे, दादासाहेब सरनौबत, बापुसाहेब कार्ले, सचिन देशमुख, अकाश पिंपळे, ऋषिकेश मोरे, सनी सदाफुले, भाऊ पोटफोडे, जगन्नाथ म्हेत्रे, बंटी पाटील, शंभु भोसले ॲड घनशाम राळेभात गोपी देवा अनिल पाटील, आप्पा पंडीत, अक्षय खिळे, आकाश घागरे सह अनेक हिंदुबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here