जामखेड प्रतिनिधी
जामखेड येथील लिंगायत वाणी समाजातील प्रा. अशोक कल्याण डोंगरे यांनी जिद्द चिकाटी व परिश्रमाच्या बळावर भौतिकशास्त्र विषयातील पीएचडी(डॉक्टरेट) पदवी मिळविली असून एका सामान्य कुटुंबातून अनेक अडचणींवर मात करून संपादन केलेलें हे यश पुढच्या पिढीला प्रेरणा मिळेल असेच आहे. समाजातील तरुणांनी त्यांचा आदर्श घ्यावा असे प्रतिपादन प.पु.श्री. मुक्तेश्वर शिवाचार्य वेळापुरकर महाराज यांनी व्यक्त केले.
जामखेड येथील भुतवडा रोड येथील नरोटेश्वर मंदिरात परिसरात प्रा. अशोक डोंगरे यांचा सपत्नीक सत्काराचे आयोजन करण्यात आले होते .या वेळी उपस्थितांना मार्गदर्शन करताना श्री वेळापुरकर महाराज बोलत होते यावेळी प्रतिष्ठीत व्यवसायिक अशोक डोंगरे ,शिवानंद हडकुळे, स्वामी शिवानंद, हरेश्वर स्वामी ,अमोल लोहकरे, आदर्श डोंगरे, बजरंग सरडे , बजरंग डुचे, शिवाजी कानडे, ज्ञानेश्वर अंदुरे,विजय जाधव, संभाजी मुळे, गिरीश काथवटे, मनोज कार्ले, गणेश राळेभात, संतोष नवलाखा,महेश कस्तुरे, अमरनाथ डोंगरे,विजय डोंगरे, दिंगाबर फुटाणे आदी मान्यवरांसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.प्रा. अशोक डोंगरे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला. यावेळी विविध मान्यवरांनी आपली मते व्यक्त केली.यावेळी उपस्थितांसाठी सहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्वाती सरडे तर आभार उत्कर्षा डोंगरे यांनी मानले.