जामखेड प्रतिनिधी
स्वच्छता व पर्यावरणाचे महत्त्व ओळखून नगरसेवक दिंगाबर चव्हाण यांनी प्रभाग दोन मध्ये धोत्री येथे सुमारे तीनशे वड, पिंपळ, सप्तपर्णी व लिंबाची तीनशे झाडे लावून संरक्षक जाळी बसवून तीन वर्षापासून टॅंकरने पाणी घालून परिसर हरित केला आहे. तसेच झाडांची निगा परिसराची स्वच्छता यासाठी प्रभागातील विद्यार्थी, महिला व नागरिकांच्या सहकार्याने स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे.
आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या स्वच्छ सर्वेक्षण अभियानात त्यांच्या मार्गदर्शनानुसार प्रभाग दोन मध्ये सर्वाच्या सहकार्याने राबविण्यात येत आहे.
पाच वर्षापूर्वी प्रभाग दोन मधुन नगरसेवक दिंगाबर चव्हाण हे सर्वाधिक मताधिक्य घेऊन विजयी झाले. लोकांच्या विश्वासास पात्र अहोरात्र जनतेच्या सुख दु:खात सहभागी होत प्रभागाचा कायापालट करण्याचा संकल्प केला. ओसाड असलेल्या धोत्री गावात तीन वर्षांपूर्वी साकत रोडवरील धोत्री फाटा ते गावातील शाळेपर्यंत व दुसर्या रस्त्यावरही सुमारे तीनशे वड, पिंपळ, सप्तपर्णी व लिंबाची झाडे लावून प्रत्येक झाडांना संरक्षक जाळी बसवून पदरमोड करून टॅंकरने पाणी घातले आज झाडे डेरेदार झालेली आहेत. झाडांमुळे परिसर हिरवागार झाला आहे.
प्रत्येकाच्या सुख – दु:खात अहोरात्र उपलब्ध होणारा नगरसेवक प्रत्येकास आपल्यातील वाटत आहे. त्यामुळे हक्काने लोक आपल्या अडीअडचणी चव्हाण यांच्या समोर मांडतात व ते हिरीरीने त्या सोडवतात.
कर्जत-जामखेडला स्वच्छ सर्वेक्षणात अव्वल स्थानावर आणण्यासाठी आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार स्वच्छता अभियान राबवत आहेत. यामध्ये नगरसेवक दिंगाबर चव्हाण यांनी हिरीरीने सहभागी होत प्रभागातील विद्यार्थी, महिला व नागरिकांना एकत्र घेऊन त्यांना स्वच्छतेचे महत्त्व सांगुन स्वच्छता मोहीम राबवत आहेत. स्वतः कधी हातात झाडू कधी खराटा तर कधी टिकाव खोरे घेऊन स्वच्छता करतात त्यामुळे नागरिकही हिरिरीने सहभागी होतात. स्वच्छता, पर्यावरण व नागरिकांच्या सुख दु:खासाठी दिंगाबर चव्हाण हे अहोरात्र झटत आहेत.