जामखेड न्युज—–
स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेत तेलंगशी शाळेची ऋत्वी धस जिल्ह्यात प्रथम
हिंद सेवा मंडळ अहिल्यानगर आयोजित स्टुडंट टॅलेंट सर्च परीक्षेत जि.प.प्रा.केंद्र शाळा तेलंगशी या शाळेतील इयत्ता पहिलीची विद्यार्थीनी ऋत्वी रविंद्र धस हिने अहिल्यानगर जिल्ह्यात प्रथम क्रमांक मिळवला आहे.ऋत्वीने 150 पैकी 140 गुण मिळवले आहेत.
बालवयापासूनच स्पर्धा परीक्षेची तयारी करणे हे अत्यंत महत्त्वाचे आहे.ऋत्वी ही अतिशय शांत व अभ्यासू असून तिच्या या बालवयातील उत्तुंग यशाचे सर्वञ कौतुक होत आहे.
ऋत्वीला विजयकुमार रेणुके,अशोक जाधव, रविंद्र धस यांच्यासह लक्ष्मी जायभाय,विकास पाचरणे,सुशेन चेंटमपल्ले, मुख्याध्यापक संतोष गोरे व आदर्श शिक्षक चंद्रकांत अरण्ये यांचे मार्गदर्शन लाभले.