सभापती प्रा. राम शिंदे यांच्या तर्फे जि. प. शाळा साकतला इंटर ऍक्टिव्ह पॅनल बोर्ड भेट
जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा साकत येथे विधान परिषद सभापती माननीय आमदार राम शिंदे साहेब यांनी मुलांना ई लर्निंग साठी 65 इंची इंटर ऍक्टिव्ह पॅनल बोर्ड भेट दिला यामुळे विद्यार्थ्यांना आधुनिक ज्ञान मिळणार आहे.
जि. प. प्राथमिक केंद्र शाळा, साकत येथे इंटरॅक्टिव्ह पॅनलचे भव्य उद्घाटन जि. प. प्राथमिक केंद्र शाळा, साकत येथे आधुनिक शिक्षणाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल म्हणून इंटरॅक्टिव्ह पॅनलचे उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला.
या कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांना डिजिटल तंत्रज्ञानाच्या साहाय्याने गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
या उद्घाटन सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून जामखेड पंचायत समितीचे माजी सभापती डॉ. भगवानराव मुरुमकर, माजी सरपंच कांतीलाल वराट, माजी सरपंच हरिभाऊ मुरुमकर, ग्रामपंचायत सदस्य मिलन घोडेस्वार, पोलीस पाटील महादेव वराट, आप्पासाहेब मुरुमकर, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गीताताई वराट, पत्रकार बाळासाहेब वराट व नागराज मुरुमकर उपस्थित होते.
कार्यक्रमाचे मार्गदर्शन मुख्याध्यापक वैजनाथ गीते यांनी केले. तसेच पवार मॅडम, शेख मॅडम, गाढवे सर, वराट मॅडम, कांबळे सर, निगोडे मॅडम यांचे विशेष सहकार्य लाभले.
इंटरॅक्टिव्ह पॅनलमुळे विद्यार्थ्यांना चित्रफीत, अॅनिमेशन व शैक्षणिक सादरीकरणाच्या माध्यमातून विषय अधिक सोप्या व आकर्षक पद्धतीने समजणार आहेत. उपस्थित मान्यवरांनी शाळेच्या या उपक्रमाचे कौतुक करून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यास शुभेच्छा दिल्या.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस विद्यार्थ्यांनी पाहुण्यांचे स्वागतगीत सादर करून आनंद व्यक्त केला. संपूर्ण कार्यक्रम उत्साहपूर्ण व प्रेरणादायी वातावरणात पार पडला.