शिवजयंती उत्सवानिमित्त शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथ गड यांच्या काल्याच्या कीर्तनाने मोठ्या उत्साहात सांगता अष्टविनायक गणेश मंदिर चौधरी नगर व शिवगर्जना प्रतिष्ठान यांच्या वतीने गेल्या सात वर्षापासून स्तुत्य उपक्रम
शिवजयंती उत्सवानिमित्त शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित अखंड हरिनाम सप्ताहाची महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथ गड यांच्या काल्याच्या कीर्तनाने मोठ्या उत्साहात सांगता
अष्टविनायक गणेश मंदिर चौधरी नगर व शिवगर्जना प्रतिष्ठान यांच्या वतीने गेल्या सात वर्षापासून स्तुत्य उपक्रम
गेल्या सात वर्षापासून शिवगर्जना प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित वैकुंठवासी कमलबाई पांडुरंग चौधरी ( पाटलीन बाई) यांच्या स्मरणार्थ शिवगर्जना भक्ती महोत्सव शिवजयंती उत्सवानिमित्त अष्टविनायक गणेश मंदिर चौधरी नगर तसेचशिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित शिवगर्जना भक्ती महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज नगर जामखेडयांच्या वतीने अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात येत असते याची सांगता हभप महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथ गड यांच्या अमृततुल्य काल्याच्या कीर्तनाने मोठ्या उत्साहात सांगता झाली या सप्ताहासाठी शिवाजीनगर, संभाजीनगर सह जामखेड शहरातील व परिसरातील भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.
अष्टविनायक गणेश मंदिर चौधरी नगर शिवगर्जना प्रतिष्ठान आयोजित शिवगर्जना भक्ती महोत्सव छत्रपती शिवाजी महाराज नगर जामखेडव छत्रपती शिवाजी महाराज मार्केट यार्ड सर्व व्यापारी संघटना सौजन्याने चालू असलेलाछत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त अखंड हरिनाम सप्ताह सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न व या सप्ताहाची सांगता काल्याचे किर्तन ह भ प महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथ गड यांच्या अमृततुल्य अशा कीर्तनाने भक्तिमय वातावरणात हजारो लोकांच्या उपस्थितीत पार पडले.
या कार्यक्रमाचे वर्ष 7 सातवे पूर्ण झालेले आहे श्री पंकज शेठ चौधरी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व आयोजनामध्ये अखंड असा हरिनाम सप्ताह नऊ दिवसांचा छत्रपती शिवरायांच्या जयंती निमित्त सालाबाद प्रमाणे मोठ्या उत्साहात पार पडला संपन्न झाला. कार्यक्रम यशस्वीतेसाठी शिवगर्जना प्रतिष्ठान व अष्टविनायक गणेश मंदिर चौधरी नगर तरूणांनी कष्ट घेतले.
ह. भ. प. भागवताचार्य स्वामी गोरक्षनाथ महाराज भिलारे यांचे सात दिवस ज्ञानेश्वरी पारायण व्यासपीठ चालक होते.
सात दिवस पुढील मान्यवर महाराजांची किर्तन सेवा झाली
बुधवार दि. ११ फेब्रुवारी रोजी हभप भागवताचार्य स्वामी गोरक्षनाथ महाराज भिलारे यांचे किर्तन झाले तसेच गुरूवार दि. १२ रोजी हभप रामायणाचार्य शरद महाराज फसाटे यांचे किर्तन झाले.शुक्रवार दि. १३ रोजी हभप सोमनाथ महाराज कर्डिले माजलगाव यांचे किर्तन होईल. शनिवार दि. १४ रोजी हभप शिवचरित्रकार किरण महाराज मोटे गेवराई, रविवार दि. १५ रोजी हभप महाशिवपुराणाचार्य नवनाथ महाराज नाईकवाडे वडवणी, सोमवार दि. १६ रोजी हभप विजय महाराज नेहरे आळंदी देवाची, मंगळवार दि. १७ रोजी हभप विनोदिचार्य सिद्धेश्वर महाराज बागलाने, बुधवार दि. १८ रोजी हभप महंत भानुदास महाराज शास्त्रीजी श्रीराम संस्थान गोयळवाडा अशा प्रकारे महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांची किर्तने झाली तर गुरूवार दि.१९ रोजी हभप महंत विठ्ठल महाराज गहिनीनाथ गड यांचे काल्याचे किर्तन झाले.
या कार्यक्रमासाठी गायनाचार्य संगीत अलंकार हभप मुकुंद महाराज भवर, हभप प्रथमेश महाराज देवकाते हे होते.
तर मृदंगाचार्य मृदंगविशारद अविराज महाराज वटाणे, आळंदी देवाची विठ्ठल मंदिर भजनी मंडळ, नागेश्वर भजनी मंडळ यांनी साथ दिली.