पोलीस कारवाई नंतर अवघ्या पंधरा मिनिटांत सुरू होते परत अवैध दारू विक्री जामखेड तालुक्यातील अजब प्रकार, लवकरच महिला व ग्रामस्थ तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार
पोलीस कारवाई नंतर अवघ्या पंधरा मिनिटांत सुरू होते परत अवैध दारू विक्री
जामखेड तालुक्यातील अजब प्रकार, लवकरच महिला व ग्रामस्थ तीव्र स्वरूपाचे आंदोलन करणार
तालुक्यातील देवदैठण हे गाव खंडोबाचे देवस्थान म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. अनेकांचे कुलदैवत म्हणून मोठ्या प्रमाणावर भाविक हजेरी लावत असतात. याच पवित्र ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांमुळे गावातील महिला, व ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामुळे परिसरातील महिला व ग्रामस्थांनी दोन महिन्यांपूर्वी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी म्हणून आंदोलन केले होते तसेच ग्रामसभेत दारू बंदीचा ठराव घेतला होता.
महिन्यांपूर्वी तर महिला, ग्रामस्थ व पोलीस यांनी संयुक्त कारवाई करत मोठ्या प्रमाणावर अवैध दारू साठा जप्त केला होता. अनेक वेळा पोलीस कारवाई करतात पण आश्चर्य म्हणजे पोलीस कारवाई नंतर लगेच पंधरा मिनिटांत अवैध दारू विक्री सुरू होते.
एका महिन्यात खर्डा पोलीसांनी चार पाच वेळा धाडी टाकून अवैध दारू जप्त केली होती तसेच अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई देखील केली होती. तरीही अवैध दारू विक्रेते राजरोस पणे दारू विक्री करत होते. तसेच दारू विक्रेते आपला दारूचा माल जवळच असलेल्या शेतात लपवत होते. त्यामुळे जास्त माल सापडत नव्हता.
दारू विक्रेते वेगवेगळ्या ठिकाणी माल ठेवतात. कुठे शेतात, ओढ्यात, घराच्या आसपास माल लपवून ठेवतात. पोलीसांना एकाच ठिकाणचा माल सापडतो. तसेच दररोज किमान तीन वेळा सकाळ दुपार, सायंकाळ जामखेड वरून दारूचा माल आणला जातो. अनेक वेळा मोटारसायकल वरती काॅलेजची सँक पाटीवर अडकून माल आणला जातो प्रत्येक वेळी वेगवेगळी शकल लढवली जाते.
महिन्यापुर्वी काही ग्रामस्थांनी पाळत ठेवत माल कुठे कुठे आहे याची माहिती घेतली काही ग्रामस्थ यांनी खर्डा पोलीसांना कळविले व खर्डा पोलीसांनी सिव्हिल ड्रेस वर येऊन महिला ग्रामस्थ यांनी संयुक्त मोहिम राबवत अवैध दारू विक्रेते यांच्या दुकानांवर धाड टाकत देशी, विदेशी जवळपास साडेबारा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली होती. पण दुसऱ्या दिवसांपासून परत माल विक्रीला सुरूवात झाली.
चौकट अवैध दारू विक्री मध्ये आली आधुनिकता फोन काँलवर हवा तो हवा तेथे माल पोहच होता. साठा वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेला असतो. पोलीस कारवाई झाली तर एकाच ठिकाणचा माल सापडतो. दुसरीकडचा माल सेफ असतो जामखेड च्या दुकानापासून गावापर्यंत यंत्रणा सज्ज असते. फोन वर माल देण्यात येतो. आँनलाईन दारू विक्री जोरात सुरू आहे.
चौकट अवैध दारू विक्री विरोधात महिला करणार तीव्र स्वरूपाचे आंदोलन
अवैध दारू विक्री मुळे अनेक संसार उद्ध्वस्त झाले आहेत. अनेक वेळा अवैध दारू विक्रेत्यांना सांगून पाहिले, ग्रामसभेत ठराव केले, पोलिसांकडून कारवाई केली तरीही दारू विक्रेते परत राजरोस पणे दारू विक्री करतात यामुळे आता गावातील महिला ग्रामस्थांना बरोबर घेऊन तीव्र स्वरूपाचे आंदोलन करण्यात येणार आहे असे महिलांनी सांगितले.