मुख्यमंत्री साहेब तुम्हीच सांगा 1800 रुपयांमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा पेन्शन मिळत नसल्याने सेवानिवृत्त शिक्षकांचे हाल, मोलमजुरी करण्याची वेळ 26 वर्षे नोकरी करून सेवानिवृत्त झालेल्या झालेल्या शिक्षकाची करूण कहाणी
मुख्यमंत्री साहेब तुम्हीच सांगा 1800 रुपयांमध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा
पेन्शन मिळत नसल्याने सेवानिवृत्त शिक्षकांचे हाल,मोलमजुरी करण्याची वेळ
26 वर्षे नोकरी करून सेवानिवृत्त झालेल्या झालेल्या शिक्षकाची करूण कहाणी
शासनाच्या 2005 पासून पुढील शिक्षकांना जुनी पेन्शन नाही या निर्णयामुळे एका वर्षापूर्वी सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकाला वर्षभरात पाच पैसे ही पेन्शन मिळाली नाही यामुळे त्या शिक्षकावर कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी मोलमजुरी करण्याची वेळ आली आहे. यामुळे शासनाने जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी होत आहे.
1998 मध्ये शिक्षक म्हणून विनाअनुदानित तुकडीवर नोकरीला लागलेले शिक्षक 2006 मध्ये शंकर टक्के अनुदानावर आले 2002 मध्ये वीस टक्के अनुदान, 2003 मध्ये चाळीस टक्के अनुदान, 2004 मध्ये साठ टक्के अनुदान, 2005 मध्ये ऐंशी टक्के अनुदान व 2006 मध्ये शंभर टक्के अनुदान प्राप्त झाले.
2002 पासून भविष्य निर्वाह निधी खाते उघडले दरमहा नियमित हप्ता पगारातून कटिंग होत होता यानंतर 2006 मध्ये भविष्य निर्वाह निधी खाते बंद करून डीसीपीएस खाते सुरू केले. दहा महिने नियमित हप्ता गेला यानंतर डीसीपीएस खाते बंद करून एनपीएस खाते सुरू केले म्हणजे एकाच शिक्षकांचे तीनही प्रकारचे खाते तीनही खात्यात रक्कम जमा होती. या शिक्षकांनंतर लागलेल्या अनेक शिक्षकांचे भविष्य निर्वाह निधी खाते सुरू राहिले शासनाचे धोरण, जिल्हा परिषदचा अनागोंदी कारभार यामुळे तीनही खाते झाले.
मार्च 2024 मध्ये हे शिक्षक सेवानिवृत्त झाले भविष्य निर्वाह निधी जमा पैसे मिळाले यानंतर एनपीएस जमा रक्कमेच्या साठ टक्के रक्कम मिळाली चाळीस टक्के रक्कम शासन शेअर मार्केट मध्ये गुंतवणूक करणार व त्यातून मिळणाऱ्या व्याजातून नवीन पेन्शन देणार असे झाले तर या शिक्षकाला 1800 ( अठराशे) रुपयाच्या आसपास पेन्शन मिळू शकते. मुख्यमंत्री साहेब तुम्हीच सांगा अठराशे रुपयामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करावा. यामुळे मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय नाही.
पेन्शन मिळत नसल्याने घर खर्च कसा भागवयचा कसा? असा प्रश्न आता या ज्येष्ठ शिक्षकांसमोर उभा राहिला आहे. पैसे नसल्याने अनेकदा दवाखान्यात जाता येत नाही. औषधोपचार घेत येत नसल्याचे देखील काही सेवानिवृत्त शिक्षकांनी सांगितले.
1998 ची नियुक्ती असुनही 2006 मध्ये शंभर टक्के अनुदान आले यामुळे या शिक्षकाचा पेन्शन प्रस्ताव दोन वेळा माघारी आला आहे. नवीन पेन्शन नुसार पेन्शन मिळाली तर 1800 रूपये महिना पेन्शन मिळू शकते. 26 वर्षे सेवा करून सेवानिवृत्त झालेल्या शिक्षकांवर मोलमजुरी करण्याशिवाय पर्याय नाही.
अठराशे रुपयामध्ये कुटुंबाचा उदरनिर्वाह, औषधोपचार, कपडेलत्ते, पै पाहुणे याचा खर्च कसा भागवायचा असा प्रश्न सेवानिवृत्त शिक्षकांसमोर आहे. शासनाने लवकरात लवकर जुनी पेन्शन योजना लागू करावी अशी मागणी होत आहे.