शासकीय गोडाऊन पाडल्याप्रकरणी खर्डा पोलीस स्टेशनला चार जणांविरोधात गुन्हा दाखल
जामखेड तालुक्यातील ऐतिहासिक खर्डा येथील बस स्थानकासमोरील शासकीय धान्य गोदाम, जुने तलाठी कार्यालय व शासकीय दवाखाना या शासनाच्या मालमत्ता असतानाही बंद गोडाऊन चे कुलुप तोडुन त्या जेसीबीच्या सहाय्याने पाडुन 20 लाख रुपयांचे नुकसान केले. या प्रकरणी ज्योतीताई गोलेकर व जेसीबी चालक यांच्यासह चार जणांवर सरकारी मालमत्तेचे नुकसान केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी महिला ज्योती शिरीष गोलेकर, संग्राम शिरीष गोलेकर, जे सी बी मालक सुमित सुधीर चावणे, तिघे रा. खर्डा ता. जामखेड व जेसीबी चालक तुकाराम आत्माराम सुरवसे रा.गवळवाडी ता.जामखेड आशा चार जणांनवर खर्डा पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी कि, दि 18 मार्च 2025 रोजी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास ऐतिहासिक खर्डा शहरातील बस स्थानका समोरील जुना सर्वे नंबर 286, नवीन सर्वे नंबर 137 व गट नंबर 360 मधिल शासकीय धान्य गोदाम, जुने तलाठी कार्यालय व शासकीय दवाखाना या ठिकाणच्या शासनाच्या मालमत्ता असतानाही वरील आरोपींनी त्या जेसीबीच्या सहाय्याने पाडुन नुकसान केले होते.
तसेच त्या ठिकाणी असलेल्या गाळेधारकांना अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन दहशत निर्माण केली होती.
या प्रकरणी खर्डा ग्रामस्थांनी जामखेड चे तहसीलदार व पोलीस स्टेशन यांना देखील निवेदन दिले होते व संबंधित लोकांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली होती.
आखेर या प्रकरणी मंडळ अधिकारी विजय बापुराव चव्हाण, तहसील कार्यालयात जामखेड यांनी खर्डा पोलीस स्टेशनला वरील आरोपींन विरोधात फीर्याद दाखल केली आहे. वरील आरोपींनी खर्डा येथील शासकीय धान्य गोदाम, तलाठी कार्यालय व शासकीय दवाखाना या शासनाची मालमत्ता असल्याचे माहीत असताही बंद गोडाऊन चे कुलुप तोडुन त्यामध्ये प्रवेश केला.
तसेच इमारती वरील पत्रे, सागवानी दरवाजे खिडक्या व शवसागवानी लाकडे काढून नेले आहेत. तसेच शासकीय मालमत्तेचा अपहार करुन सर्व शासकीय इमारती पाडुन 20 लाख रुपयांचे नुकसान केले आहे. तसेच गाळेधारक उमेश मोतीलाल गुरसाळी, रघुनाथ शंकर खेडकर व रेवण गणपत कोठावळे यांना आरोपींनी अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करुन दहशत निर्माण केली व गाळे जबरदस्तीने ताब्यात घेतले आहेत आसे फिर्यादीत म्हटले आहे. या प्रकरणी वरील महिलेसह चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सपोनि विजय झंजाड हे करीत आहेत.