जामखेड प्रतिनिधी
क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले जयंतीनिमित्त रमेश आजबे मित्रमंडळाच्या वतीने महिला मेळावा आयोजित करून महिला अंतरंग स्वच्छता जागृती मोहिम राबविण्यात आली महिलांच्या अडीअडचणी, समस्या व स्वच्छता विषयी डॉ माया पोकळे यांनी मार्गदर्शन केले.
आज सकाळी प्रभाग पाच मधील पोकळे वस्ती, खडकवाडी, काटकर वस्ती येथे महिलांचा मेळावा आयोजित करण्यात आला होता. यामध्ये स्त्रीरोग तज्ञ् डॉ. माया पोकळे यांच्या मार्गदर्शनाखाली “महिला अंतरंग स्वच्छता जागृती उपक्रम ” घेण्यात आला या कार्यक्रमात डॉ माया पोकळे यांनी महिलांच्या स्वछते बद्दल खूप छान मार्गदर्शन केले व महिलांनी सुद्धा त्याला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आपल्या शंका डॉक्टरांना विचारल्या व त्यांच्या शंकाचे डॉक्टरांनी केले तसेच कार्यक्रमाच्या अखेरीस महिलांना विशेष भेटवस्तू म्हणून हायजिन किट वाटप करण्यात आले .
आमदार रोहित पवार व त्यांच्या मातोश्री सुनंदाताई पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सावळेश्वर उद्योग समूहाचे रमेश दादा आजबे व इंदुबाई (काकू) आजबे यांनी आयोजित केला होता. या कार्यक्रमास जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेतला व या कार्यक्रमाचा उपयोग त्यांना मोठ्या प्रमाणात झाला अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली व रमेश दादा आजबे आणि इंदुबाई आजबे यांचे आभार मानले.
रमेश आजबे यांनी आतापर्यंत जामखेड परिसरातील नागरिकांसाठी अनेक विकासकामे मार्गी लावलेली आहेत.
जुन्या मंदिरांचा जिर्णोद्धार, शाळांमध्ये एलईडी प्रोजेक्टर, लोकांसाठी चांगले रस्ते, गटारे, रस्त्यावर पेव्हिंग ब्लाॅक, पाण्याची सोय, परिसरात वृक्षारोपण करून संरक्षक जाळी बसवून उन्हाळ्यात टॅंकरने पाणीपुरवठा, मोफत उपचार करणाऱ्या आरोळे कोविड सेंटरला गहू व तांदळाचा तसेच लाखो रुपयांचा आॅक्सिजन पुरवठा शासकीय कार्यालयात रिक्षा चालक, हमाल पंचायत व कोविड सेंटरला मोफत मास्कचे व सॅनिटायझरचे वाटप सार्वजनिक ठिकाणी कुपनलिका घेऊन पाणीपुरवठ्याची सोय वाडी वस्तीवरील रस्ते अशा प्रकारे सावळेश्वर उद्योग समूहाच्या माध्यमातून कोट्यावधी रुपये पदरमोड करून रमेश आजबे समाजसेवा करणारा खरा अवलिया आहे. लोकांच्या कल्याणासाठी अहोरात्र परिश्रम आजबे घेत आहेत.