जामखेड प्रतिनिधी
अवैद्य धंद्यावर जामखेड पोलीसांचे छापा सत्र सुरूच असून आज दोन ठिकाणी छापे टाकून पंधरा हजार रुपयांची दारु जप्त करून दोघांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीसांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार खर्डा रोडवरील बोराटे वस्ती येथे एका टपरीच्या आडोशाला एका प्लास्टिक गोणीत विदेशी दारूची विक्री चालु आहे. त्यानुसार जामखेड पोलीसांनी त्याठिकाणी छापा टाकला असता आरोपी मिलींद महादेव काळे रा.तेलंगशी ता.जामखेड त्याचेकडे 13440/- रूपये
किंमतीच्या विदेशी दारूच्या बाटल्या जप्त करून त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसर्या घटनेत जामखेड ते नगर रोडलगत सांयकाळी हॉटेल देशी तडका येथे छापा टाकला असता त्या ठिकाणी 1740/- रूपये किमतीची विदेशी दारू जप्त करून सचिन निवृत्ती बारगजे रा.जामखेड यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदर गुन्हयाचा तपास पोलीस निरीक्षक संभाजी गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेडकॉन्स्टेबल बापू गव्हाणे व पोलीस नाईक रमेश फुलमाळी करत आहेत. सदरची कामगिरी पोलीस कॉन्स्टेबल विजयकुमार कोळी आबासाहेब आवारे, संदिप राऊत, संदिप आजबे, अरूण
पवार, अविनाश ढेरे, शिवलिंग लोंढे यांनी केली आहे.
सर्वसामान्य नागरिकांकडून पोलीसांच्या कारवाई बद्दल समाधान व्यक्त केले जात आहे.