विजय महामुनी देतायत बाभुळगाव शाळेतील विद्यार्थ्यांना धनुर्विद्येचे धडे, अहिल्यानगर जिल्ह्यातील एकमेव शाळा
राहुरी तालुक्यातील बाबुळगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत 34 विद्यार्थ्यांना धनुर्विद्येचे प्रशिक्षण दिले जात आहे हे प्रशिक्षण घेण्यासाठी मुलींची संख्या जास्त आहे विद्यार्थ्यांमध्ये एकाग्रता तसेच अभ्यासात रुची निर्माण व्हावी हा धनुर्विद्या शिकवण्याचा उद्देश असल्याचे शिक्षक विजय महामुनी यांनी सांगितले.
बाबुळगाव जिल्हा परिषद शाळेत जुलै 2023 पासून हा उपक्रम राबविण्यात येत आहे 34 विद्यार्थ्यांपैकी नऊ विद्यार्थी आता तालुक्यातील खडांबे तसेच महात्मा फुले कृषी विद्यापीठातील सावित्रीबाई फुले विद्यालयात शिक्षण घेत आहेत आठवड्यातील तीन दिवस सोमवार बुधवार आणि शुक्रवार हे प्रशिक्षण दिले जाते.
प्रशिक्षणाला सुरुवात झाल्या नंतर सुरुवातीला दीड महिना विद्यार्थ्यांना धनुष्याला बाण लावण्याचा सराव घेतला जातो इयत्ता पाचवी ते सातवी या विद्यार्थी सर्व विद्यार्थी एकत्रित केले जातात त्यामध्ये प्रत्येकाच्या हातात सुरुवातीला धनुष्य दिला जातो ज्या विद्यार्थ्यांचे हात स्थिर होतात व हाताच्या स्नायूंना बळकटी येते अशा विद्यार्थ्यांची प्रशिक्षणासाठी निवड केली जाते या प्रशिक्षणाचा कालावधी कमीत कमी सहा महिन्यांचा असतो प्रशिक्षणामध्ये परिपक्व झालेल्या विद्यार्थ्यांना टोकाचा बाण हाती देऊन टार्गेट सेट करून वीस फुटावरून बाण मारण्याचा सराव करून घेतला जातो आणि अचूकता वाढवण्याचा प्रयत्न केला जातो.
मागील वर्षीपासून सुरू झालेला धनुर्विद्येचा सराव आजही या शाळेत सुरू आहे टारगेटवर बांध मारल्यानंतर दहा गुण दिले जातात व त्या विद्यार्थ्यांचा फोटो काढून गावातील व्हाट्सअप च्या ग्रुपला प्रोत्साहन म्हणून टाकला जातो त्याचे कौतुक केले जाते त्यामुळे विद्यार्थ्यांना आणखी प्रेरणा मिळते असे शिक्षकांची म्हणणे आहे.
या खेळाचे साहित्य जिल्हा परिषद क्रीडा विभागाने उपलब्ध करून दिले आहे. खेळाचे प्रशिक्षण देण्यासाठी गटशिक्षणाधिकारी मोहिनीराज तुंबारे विस्तार अधिकारी अर्जुन गारुडकर केंद्रप्रमुख विद्या भागवत मुख्याध्यापक धर्मराज घुले आदिलसह अन्य शिक्षकांचे योगदान लाभत असल्याचे विजय महामुनी यांनी सांगितले.
या खेळाचे प्रशिक्षण मोठमोठ्या शाळांमध्येच दिले जाते सर्वसामान्यांना एवढी मोठी फी भरणे शक्य नसते प्रशिक्षक देणाऱ्या शिक्षकांनी सुरुवातीला नगर पुणे तसेच youtube वर प्रशिक्षण घेतले त्यानंतर विद्यार्थ्यांना विनामूल्य आठवड्यातील तीन दिवस प्रशिक्षण दिले जाते इतर खेळांप्रमाणे या खेळाची ही स्पर्धा शासनाने जिल्हा पातळीवर घेतली पाहिजे. विजय महामुनी, प्रशिक्षक
इतर कोणत्याच जिल्हा परिषद शाळेत शिकवण्यात येत नसलेला धनुर्विद्या हा खेळ आमच्या शाळेत शिकवला जातो प्रत्येक कौशल्य बारकाईने कसे आत्मसात करायचे याचे प्रशिक्षण प्रशिक्षक विजय महामुनी यांनी आम्हाला दिले या खेळामुळे आमच्या अंगी एकाग्रता वाढीस लागली याचा उपयोग आम्हाला अभ्यासातही होत आहे. संकेत माने विद्यार्थी
दोन वर्षापासून बाबुळगाव जिल्हा परिषद शाळेत धनुर्विद्येचे प्रशिक्षण दिले जात आहे जिल्हा परिषद शाळेत अगदी ग्रामीण भागात सुरू असलेला हा उपक्रम जिल्ह्यात चर्चेचा विषय ठरला आहे विद्यार्थ्यांनीही याबाबतीत समाधान व्यक्त केले आहे.