जामखेड तालुक्यात अवैध दारू दुकानावर महिला, ग्रामस्थ व पोलीसांचा संयुक्त हल्लाबोल, चार दारू विक्रेत्यांविरोधात खर्डा पोलीसांची कारवाई

0
1746

जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यात अवैध दारू दुकानांवर महिला, ग्रामस्थ व पोलीसांचा संयुक्त हल्लाबोल, चार दारू विक्रेत्यांविरोधात खर्डा पोलीसांची कारवाई

 

तालुक्यातील देवदैठण हे गाव खंडोबाचे देवस्थान म्हणून परिसरात प्रसिद्ध आहे. अनेकांचे कुलदैवत म्हणून मोठ्या प्रमाणावर भाविक हजेरी लावत असतात. याच पवित्र ठिकाणी अवैध दारू विक्रेत्यांमुळे गावातील महिला, व ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागतो. यामुळे परिसरातील महिला व ग्रामस्थांनी एका महिन्यांपूर्वी अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई करावी म्हणून आंदोलन केले होते तसेच ग्रामसभेत दारू बंदीचा ठराव घेतला होता.

यानुसार महिना भरात खर्डा पोलीसांनी चार पाच वेळा धाडी टाकून अवैध दारू जप्त केली होती तसेच अवैध दारू विक्रेत्यांवर कारवाई देखील केली होती. तरीही अवैध दारू विक्रेते राजरोस पणे दारू विक्री करत होते. तसेच दारू विक्रेते आपला दारूचा माल जवळच असलेल्या शेतात लपवत होते. त्यामुळे जास्त माल सापडत नव्हता.

काही ग्रामस्थांनी पाळत ठेवत माल कुठे कुठे आहे याची माहिती घेतली काही ग्रामस्थ यांनी खर्डा पोलीसांना कळविले व खर्डा पोलीसांनी सिव्हिल ड्रेस वर येऊन महिला ग्रामस्थ यांनी संयुक्त मोहिम राबवत अवैध दारू विक्रेते यांच्या दुकानांवर धाड टाकत देशी, विदेशी जवळपास साडेबारा हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. तसेच ग्रामस्थांनी अनेक बाँक्स मधील दारू बाटल्या फोडून टाकल्या. यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आज दिनांक.23/02/2025 रोजी देवदैठण गावचे पोलीस पाटील भोरे यांना देवदैठण येथे काही इसम गावांमध्ये दारू विक्री करत आहेत. अशी माहिती मिळाल्याने पोलीस अंमलदार पाठवून संयुक्तपणे कारवाई करण्यात आली. 

 

असून त्यांची नावे पुढीलप्रमाणे
1. कचरू बाजीराव जावळे वय 45 वर्ष
2. विष्णू राजेंद्र उगले वय 29 वर्ष
3. साहेबराव लक्ष्‍मण भोरे वय 67 वर्ष
4. साहेबराव श्रीपती महारनवर वय 78 वर्ष
सर्व रा.देवदैठण ता. जामखेड यांचेविरुद्ध कारवाई करण्यात आली असून सदरचे इसमांकडून एकूण 12355/- रुपये किंमतीची देशी विदेशी कंपनिची दारू पकडण्यात आला असून गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.

 

वरील घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांच्या मार्गदर्शनाखाली खर्डा पोलीस करत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here