जामखेड लक्ष्मी चौक ते तीन कोणी रस्ता अतिक्रमणाच्या विळख्यात,
रस्ता खुला करण्यासाठी योगीराज घायतडक यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
जामखेड येथील खालची वेस ( लक्ष्मी चौक) ते तीन कोणी हा जुना पाणंद रस्ता 25 फुटाचा असून सदर रस्त्यालगत अतिक्रमणे झालेली आहेत त्यामुळे हा रस्ता गायब झाला आहे. प्रशासनाने रस्ता खुला करावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांना पाठवलेल्या निवेदनाद्वारे सामाजिक कार्यकर्ते योगीराज घायतडक यांनी केली आहे. रस्ता खुला न झाल्यास तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा दिला आहे.
अतिक्रमणामुळे गायब झालेला रस्ता ताबडतोब खुला करावा अतिक्रमणे हटवावीत तसेच परिसरातील नागरिकांची सोय करावी अशी मागणी योगीराज घायतडक तसेच परिसरातील नागरिकांनी जिल्हाधिकारी यांना निवेदनाद्वारे केली आहे.
लक्ष्मी चौक ( संविधान चौक) येथे असणारे लक्ष्मीमाता मंदिर हे आगोदर इलेक्ट्रीक ट्रान्सफॉर्मर लगत होते. काही लोकांनी अतिक्रमणे करत चक्क मंदिरच पुढे आणले, मंदिराची जागा पुर्वीची जागा बदलून मंदिर रस्त्यालगत बांधले आहे. त्यामुळे मंदिरापासून तीन कोणाकडे जाणारा रस्ता बंद झालेला आहे.
सध्या शहरी विकासाचा विचार करता रस्ता खुला होणे गरजेचे आहे. नवीन कोर्टाकडे व आरोळेवस्ती कडे जाणेसाठी नागरिकांना जाणे येणेसाठी व जवळचा आहे. आणि तोच रस्ता आता गायब झाला आहे. तो खुला करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
सदर लक्ष्मीमाता मंदिर पुर्वीच्या जागी बांधून सध्याच्या मंदिरापासून असलेला पुर्वीचा तिनकोणी पर्यंतचा पाणंद रस्ता नदीपात्रात पाईप टाकून रहदारीस सुरू करावा तसेच खालची वेस धाकटी नदीच्या पुलाच्या पश्चिमेकडील बाजूने दोन्ही बाजूंच्या किनाऱ्यावर कोस्टल रोड करून पुलाच्या पुर्वेस जसे सुशोभीकरण केले आहे तसे पश्चिमेस सुशोभीकरण करावे अशी मागणी निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनावर योगीराज घायतडक सह अनेक ग्रामस्थांच्या सह्या आहेत.