जामखेड तालुक्यात परीक्षा केंद्राच्या परिसरात फिरणाऱ्यावर गुन्हा दाखल, खर्डा पोलीसांची कारवाई

0
1073

जामखेड न्युज——

जामखेड तालुक्यात परीक्षा केंद्राच्या परिसरात फिरणाऱ्यावर गुन्हा दाखल, खर्डा पोलीसांची कारवाई

सध्या दहावी बारावी बोर्ड परीक्षा राज्यभरात सुरू आहे. नगर जिल्ह्यात नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाईचे प्रस्ताव तयार करण्याबरोबरच परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश जिल्हाधिकारी त्यांनी दिले आहेत. 

परीक्षा शांततेत, सुरळीत व कॉपीमुक्त कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणात व्हाव्यात यासाठी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्या संकल्पनेतील ‘आनंददायी परीक्षा पॅटर्न’ अंतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयात वॉररूम स्थापन करण्यात आली आहे. या वॉररुमच्या माध्यमातून जिल्हाधिकाऱ्यांनी स्वत: सुमारे एक हजारपेक्षा अधिक केंद्रांची पाहणी करत पर्यवेक्षणाबाबत विविध सूचना केल्या.

नियमांचे पालन न करणाऱ्या शाळांवर कारवाईचे प्रस्ताव तयार करण्याबरोबरच परीक्षा केंद्राबाहेर गोंधळ करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याचे आदेश त्यांनी दिले आहेत यानुसार जामखेड तालुक्यातील खर्डा न्यू इंग्लिश स्कूल, खर्डा येथे परिक्षा केंद्राजवळ कॉपी पुरवण्याच्या प्रकरणात एक गंभीर घटना घडली. या प्रकरणात सुजित भगवान केकाण, रा. दरडवाडी ता. जामखेड जि. अहिल्यानगर याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात 10 व बारावीचे पेपर सुरू आहेत अशातच जामखेड तालुक्यातील खर्डा येथे आज दुपारी सुमारे 1 वाजेच्या सुमारास, खर्डा न्यू इंग्लिश स्कूल येथे परिक्षा केंद्राचे बंदोबस्त करीत असलेले पोलीस अंमलदार वैजिनाथ मिसाळ, गणेश बडे, व होमगार्ड सागर जायभाय यांनी सुजित भगवान केकाण हा परिक्षा केंद्राच्या मागील बाजुस 100 मिटर परिसरामध्ये कॉपी पुरवण्याचे उद्देशाने मिळुन आल्याचे निरीक्षण केले.

या घटनेची माहिती मिळताच त्यांनी त्वरित कारवाई आली आहे. पोलीस अंमलदार वैजिनाथ मिसाळ, गणेश बडे, व होमगार्ड सागर जायभाय यांनी सुजित भगवान केकाण यांच्याविरुद्ध भारतीय न्याय सहिंता 2023 चे कलम 223 प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.सदर प्रकरणाचा पुढील तपास सपोनि विजय झंजाड यांचे मार्गदर्शनाखाली पोहेकाँ संभाजी शेंडे हे करत आहेत.

चौकट
खर्डा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय झंजाड यांनी सांगितले की पालक, नातेवाईक, मित्रमंडळीनी 10 वी 12 वी चे पेपर चालु असताना परिक्षा केंद्राच्या 200 मिटर परिसरामध्ये विनाकारन फिरु नये. अशाच प्रकारे गुन्हे दाखल केले जातील असे त्यांनी स्पष्ट केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here