विद्यार्थी जडणघडणीत योगाचे अनन्यसाधारण महत्त्व – योगशिक्षक बाळासाहेब पारखे पी. एम.श्री जि. प. धोत्री शाळेत योग शिबीर संपन्न

0
393

जामखेड न्युज——

विद्यार्थी जडणघडणीत योगाचे अनन्यसाधारण महत्त्व – योगशिक्षक बाळासाहेब पारखे

पी. एम.श्री जि. प. धोत्री शाळेत योग शिबीर संपन्न

योगाचे फायदे केवळ शारीरिकच नाहीत, तर मानसिक आणि भावनिकही आहेत. योगामुळे स्वतःच्या मनावर नियंत्रण मिळविण्यास मदत होते. ताणतणाव कमी होऊन आत्मविश्वास वाढतो. योगाभ्यासामुळे निर्णय घेण्याची क्षमता आणि नेतृत्व गुण विकसित होण्यास मदत तसेच निरोगी राहण्यासाठी योगा महत्वाचा आहे. विद्यार्थी जडणघडणीत योगाचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. असे मत योग शिक्षक प्रा. बाळासाहेब पारखे यांनी व्यक्त केले.


आज दि 22/2/2025 रोजी पी.एम.श्री शाळा धोत्री केद्र साकत ता जामखेड जि. अहिल्यानगर येथे योग प्रशिक्षण शिबीर मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

योगामुळे विद्यार्थ्यांचे शारीरिक, मानसिक आरोग्य चांगले राहते विद्यार्थी जडणघडणीत योगाला अनन्यसाधारण महत्व आहे असे उद्घाटनावेळी योग प्रशिक्षक प्राचार्य बाळासाहेब पारखे यांनी सांगितले.

यावेळी गटशिक्षणाधिकारी विजय शेवाळे, शिक्षण विस्ताराधिकारी जालिंदर खताळ, केंद्रप्रमुख नवनाथ बडे, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष घनश्याम (आण्णा) आडाले यांनी मार्गदर्शन केले.

यावेळी अविनाश कदम शाळा व्यवस्थापन समिती शिक्षण तज्ञ सदस्य, शेषराव सपकाळ, ज्ञानदेव सुपेकर, हिरामण खैरे, सुनिल खैरे, रणजित खेडकर, अशोक काळभोर, नवनाथ आडाले, रामदास काळभोर, ईश्वर भोसले, नवनाथ कदम,सनी तुपे सह ग्रामस्थ मोठ्या उपस्थित होते.

शाळेच्या मुख्याध्यापिका चंद्रकला खरपुडे व सहशिक्षक अभिमान घोडेस्वार यांनी सुंदर नियोजन केले होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here