नेवासा शेवगांव गेवराई रस्त्यावरील अतिक्रमणे निघणार, जामखेड मधील अतिक्रमणे कधी निघणार ?
नेवासा शेवगांव गेवराई रस्ता रा मा ५० या रस्त्यावरील वरील संदर्भ शासन निर्णयान्वये आदेशीत केल्यानुसार रस्त्याच्या मध्यापासुन शासनाच्या हद्दीतील सर्व अतिक्रमण काढण्याची स्थानीक स्वराज्य संस्था, महसुल, पोलीस प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्यामार्फत सयुंक्त मोहीम राबविण्यात येणार आहे.
तशी नोटीस संबंधित विभागास पाठवण्यात आली आहे. नेवासा शेवगांव गेवराई रस्ता रा मा ५० या रस्त्यावरील अतिक्रमणे निघणार आहेत मग जामखेड शहरातील गेल्या दोन वर्षांपासून रखडलेल्या महामार्गावरील शहरातील अतिक्रमणे कधी निघणार असा प्रश्न सर्व सामान्य नागरिकांना पडलेला आहे.
अतिक्रमणे हटाव मोहिमेअंतर्गत उपविभागीय अभियंता,सा.बां. उपविभाग,शेवगांव. यांनी नोटीस काढत त्याच्या प्रति संबंधित विभागास दिल्या आहेत. – १. मा. कार्यकारी अभियंता, रोहयो ( कार्य ) विभाग अहिल्यानगर यांना माहितीस्तव सविनय सादर. 2. मा. उपविभागीय अधिकारी शेवगांव पाथर्डी भाग पाथर्डी यांना माहितीस्तव सविनय सादर. ३. मा. तहसीलदार शेवगाव / यांना महितीसाठी सस्नेह अग्रेषित. ४. मा. पोलिस निरीक्षक, शेवगाव/ यांना माहितीसाठी सस्नेह अग्रेषित. ५. मा. गटविकास अधिकारी शेवगांव यांना माहितीस्तव सस्नेह अग्रेषित.
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्गाचे काम अत्यंत संथ गतीने सुरू आहे. दोन वर्षांपासून काम सुरू आहे तरीही काम निम्मेही झाले नाही. तसेच रस्त्याच्या दोन्ही बाजूंने गटार असून गटाराच्या बाहेर नगरपरिषद पाईप लाईन साठी तीन तीन फुट जागा आहे मात्र गटार झाले की लगेच अनेक ठिकाणी गटारावर टपऱ्या झाल्या. अनेकांनी तर टपऱ्या टाकून त्या भाड्याने दिलेल्या आहेत. आता पाईपलाईन कोठून जाणार असा प्रश्न निर्माण झाला आहे. तसेच लवकर रस्ता व्हावा अशी नागरिकांनी मागणी होत आहे. गटारावरील टपऱ्यासाठी दोन लाख डिपाँजीट व दहा हजार रुपये भाडे असा रेट ठरलेला आहे.
जामखेड ते सौताडा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५४८ डी. रस्ता १५७.६२ कोटी रुपयांचा रस्ता ठेकेदार ईपीसी कंत्राटदार, धनेश्वर कन्स्ट्रक्शन, गणेश कन्स्ट्रक्शन या तीन ठेकेदारांनी ८६.०९ कोटी रुपयांना काम घेतले आहे. दोन वर्षापूर्वीच काम सुरू झालेले असले तरी काम खुपच संत गतीने सुरू आहे. शहरातील जनता धुळने त्रस्त आहे. गेल्या दोन महिन्यांपासून रस्ता बंद आहे. खर्डा चौक ते विश्वक्रांती चौक पर्यंत पूर्ण रस्ता बाकी आहे. तर विश्वक्रांती चौक ते बैल बाजार गेट पर्यंत एक बाजू अपूर्ण आहे. सतत काम बंद चालू यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागत आहे. लवकरात लवकर रस्ता व्हावा अशी नागरिकांची मागणी आहे.
जामखेड सौताडा राष्ट्रीय महामार्ग 548 डी या रस्त्याची रूंदी रस्त्याच्या मध्यापासून 15 मीटर म्हणजे 50 फुट दोन्ही बाजूस आहे. गटाराबाहेर परत नगरपरिषदेच्या तीन तीन फूट जागा आहे मात्र गटारावर टपऱ्या झाल्या आहेत.