Tuesday, September 22, 2026
Home ताज्या बातम्या जामखेड एस.टी.आगारास नवीन बस मिळाव्यात व बेशिस्त कारभारात सुधारणा करावी, अन्यथा गेट...

जामखेड एस.टी.आगारास नवीन बस मिळाव्यात व बेशिस्त कारभारात सुधारणा करावी, अन्यथा गेट बंद आंदोलन करणार – संतोष गुंदेचा

0
683

जामखेड न्युज——-

जामखेड एस.टी.आगारास नवीन बस मिळाव्यात व बेशिस्त कारभारात सुधारणा करावी, अन्यथा गेट बंद आंदोलन करणार – संतोष गुंदेचा

जामखेड एस.टी.आगारास असलेल्या एकुण बसपैकी सुमारे ऐंशी टक्के बस कालबाह्य झालेल्या आहेत. तसेच प्रशासनाचा ढिसाळ कारभार यामुळे एकेकाळी नाशिक विभागात क्रमांक एकवर असलेला जामखेड विभाग सध्या शेवटच्या क्रमांकावर आलेला आहे. जामखेड एस. टी. आगारास नवीन बस मिळाव्यात व बेशिस्त कारभारात सुधारणा करावी अन्यथा गेट बंद आंदोलन करण्याचा इशारा जामखेड तालुका ग्रामीण प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष गुंदेचा
यांनी दिला आहे.

संतोष गुंदेचा यांनी सभापती प्रा. राम शिंदे यांनाही तसे निवेदन दिले आहे सभापती यांनी लगेच परिवहन मंत्र्यांकडे शिफारस केली आहे तसेच हे निवेदन परिवहन मंत्री यांनाही दिले आहे. निवेदनात म्हटले आहे की, सध्या जामखेड एस टी डेपो ला बसची कमतरता आहे. नादुरुस्त बस साठी स्पेअर पार्टची कमतरता आहे. तसेच चालक वाहक ड्युटी लावताना चुकीचे धोरण राबविले जाते. तसेच अनेक ग्रामीण भागातील मुक्कामी बस तसेच इतर बस रद्द केल्या जातात. यामुळे शालेय विद्यार्थी व महिला यांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात. या सर्व बाबींचा मंत्री महोदयांनी लक्ष घालून नवीन तीस बस द्याव्यात, कामचुकार अधिकारी कर्मचारी यांच्या वर कारवाई करावी अन्यथा गेट बंद आंदोलन करणार असा इशारा गुंदेचा यांनी केला आहे.

एसटीला चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या डेपोंपैकी एक असलेल्या जामखेड डेपोला सध्या समस्यांच्या विळख्यात सापडला आहे. कमी गाड्या, जुन्या गाड्या, नादुरुस्त गाड्या, दररोज अनेक ठिकाणी जामखेड डेपोच्या गाड्या बंद पडतात. अनेकांना बस ला धक्का देऊन चालू कराव्या लागतात यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. जामखेड बस डेपो धक्का स्टार्ट झाला आहे असे प्रवाशी म्हणतात.

तीन जिल्ह्यांच्या सरहद्दीवर असलेल्या जामखेड तालुक्यातील एसटी डेपोमध्ये एकेकाळी एकूण ७० बस होत्या आता ५५ बस आहेत पण यातील काही बस कामासाठी लावलेल्या असतात यामुळे कमी बसवर आगार व्यवस्थापकाला तारेवरची कसरत करत नियोजन करावे लागते. यातच लांब पल्ल्याच्या तसेच ग्रामीण भागात जाणाऱ्या अनेक गाड्या बंद पडतात. यामुळे प्रवाशांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे.

अनेकांना लांबच्या प्रवासासाठी जायचे असते. आणि जर गाडी बंद पडली तर वेळेवर जाता येत नाही. तसेच अनेकांचे शासकीय कामे ठप्प होतात वेळेवर जाता येत नाही. तसेच महिला व मुलींना याचा मोठा त्रास सहन करावा लागतो. यामुळे शालेय विद्यार्थी यांचे शैक्षणिक नुकसान होते.

नादुरुस्त गाड्या मुळे अपघात होतात यात प्रामुख्याने चालकालाच जबाबदर धरले जाते; मात्र, डेपोतून बाहेर पडणाऱ्या गाडीची अवस्था ठीक नसेल तर चालकाचाही नाइलाज होतो. एसटीला चांगले उत्पन्न मिळवून देणाऱ्या डेपोपैकी जामखेड डेपो आहे. त्यामुळे याकडे एसटीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी होत आहे.

जामखेड एस. टी. आगारास नवीन बस मिळाव्यात व बेशिस्त कारभारात सुधारणा करावी अन्यथा गेट बंद आंदोलन करण्याचा इशारा जामखेड तालुका ग्रामीण प्रवासी संघटनेचे तालुकाध्यक्ष संतोष गुंदेचा
यांनी दिला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!