Wednesday, November 11, 2026
Home ताज्या बातम्या माणुसकीचा दीप उजळला! जामखेडमध्ये ३०० दिव्यांग-निराधारांना अन्नदान अन् जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप; संतोष...

माणुसकीचा दीप उजळला! जामखेडमध्ये ३०० दिव्यांग-निराधारांना अन्नदान अन् जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप; संतोष पवार परिवाराचा सेवाभावी उपक्रम!

0
2
माणुसकीचा दीप उजळला! जामखेडमध्ये ३०० दिव्यांग-निराधारांना अन्नदान अन् जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप; संतोष पवार परिवाराचा सेवाभावी उपक्रम!

जामखेड न्युज – – – – – 

माणुसकीचा दीप उजळला! जामखेडमध्ये ३०० दिव्यांग-निराधारांना अन्नदान अन् जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप; संतोष पवार परिवाराचा सेवाभावी उपक्रम!

 

समाजात अनेकजण आपल्या संपत्तीचा आणि प्रतिष्ठेचा अभिमान बाळगतात; मात्र खरे मोठेपण हे गरजूंच्या मदतीला धावून जाण्यात आणि वंचितांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवण्यात असते. भुकेलेल्यांना अन्नदान करणे आणि दुःखी-कष्टाळूंच्या पाठीशी उभे राहणे हेच खरे पुण्य आहे, असे प्रतिपादन माजी जिल्हा परिषद सदस्य तथा ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर (आबा) राळेभात यांनी केले.

“स्मरण केवळ आठवणींचे नव्हे, तर संस्कार आणि सेवाभाव जपासण्याचे!” या उदात्त विचारांना अनुसरून जामखेड येथे कै. मोहन भगवान पवार आणि कै. सचिन मोहन पवार यांच्या पुण्यस्मरणार्थ उद्योगपती व सामाजिक कार्यकर्ते संतोष पवार यांच्या माध्यमातून ११ नोव्हेंबर रोजी विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधून सामाजिक बांधिलकीतून जामखेड येथील ३०० दिव्यांग आणि निराधार बंधू-भगिनींना अन्नदान व जीवनोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले.

याप्रसंगी समाजहितासाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या विविध क्षेत्रातील व्यक्तींचा गुणगौरव सोहळाही पार पडला. यामध्ये नान्नज येथील मनीषा अर्जुन मोहळकर यांना ‘महिला भूषण पुरस्कार’, सारोळा येथील अनिता ढोले यांना ‘मानवसेवा पुरस्कार’, जामखेडचे सामाजिक कार्यकर्ते संजय कोठारी यांना ‘समाजभूषण पुरस्कार’ तर कॅप्टन लक्ष्मण भोरे यांना ‘आदर्श देशभक्त पुरस्कार’ प्रदान करून सन्मानित करण्यात आले.

आपले मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे आयोजक संतोष पवार भावूक होऊन म्हणाले, “ईश्वराने आपल्याला जे काही दिले आहे, त्याचा खरा उपयोग समाजातील दीन-दुबळ्या आणि उपेक्षित लोकांची सेवा करण्यासाठीच झाला पाहिजे. समाजात जगत असताना गरीब व अपंगांची सेवा करण्यात जे आत्मिक समाधान मिळते, ते कशातच नाही. हा सेवेचा वसा आम्ही आज जपत आहोतच, पण आमची येणारी पुढील पिढीसुद्धा ही जनसेवा अखंडपणे सुरू ठेवेल, हा आमचा शब्द आहे.”. 

संतोष पवार, केतन पवार, समीक्षा पवार, शेखर पवार, पवार परिवार व शिंदे परिवार यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या सेवाभावी कार्यक्रमास भाजपचे ज्येष्ठ नेते प्रा. मधुकर राळेभात, उपमहाराष्ट्र केसरी बबन काशिद, प्रहारचे जिल्हाध्यक्ष विनोदसिंग परदेशी, जिल्हा उपाध्यक्ष जयसिंग उगले, प्रहारचे तालुकाध्यक्ष नय्युमभाई सुभेदार, काँग्रेसचे तालुकाध्यक्ष प्रा. कुंडल राळेभात, भानुदास बोराटे, गुलाबशेठ जांभळे, महादेव शिंदे, सरपंच बळीराम शिंदे, उपसरपंच दत्तात्रय शिंदे, प्रा. डॉ. रामदास पवार, नगरपालिकेचे उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, व्यापारी सुनील उगले, सतीश शिंदे, विकास पवळ, प्रा. श्रीधर जगदाळे, युवा नेते उदय पवार, गणेश हगवणे व प्रा. धनंजय भोसले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन हनुमंत महाराज निकम यांनी केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

error: Content is protected !!