जामखेड न्युज – – – – –
जामखेड शहरात बिबट्याची एन्ट्री? अनेक वस्त्यांना सतर्कतेचा इशारा, मॉर्निंग वॉक करणाऱ्यांनो सावधान!
जामखेड शहर आणि परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती वनविभागाकडून देण्यात आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. शहरातील नागरी वस्त्यांच्या जवळच बिबट्याची उपस्थिती असल्याची माहिती समोर आल्याने विशेषतः पहाटे मॉर्निंग वॉकसाठी बाहेर पडणारे नागरिक, शेतकरी आणि परिसरातील रहिवाशांनी अधिक सतर्क राहण्याची गरज निर्माण झाली आहे.

शहरातील तपेश्वर, नुराणी कॉलनी, महादेव मंदिर परिसर, कान्होपात्रा नगर, मिलीनगर, नागेश विद्यालयाचा मागील व पुढील परिसर, बीड रोडचा काही भाग तसेच शिक्षक कॉलनी या भागातील नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

या परिसरातील अनेक नागरिक सकाळी व्यायाम व फिरण्यासाठी भुतवडा रोड, कृष्णा पार्क, तपेश्वर महादेव मंदिर परिसर तसेच लेहनेवाडी रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ जात असतात. मात्र, सध्या या परिसरात बिबट्याचा वावर असल्याची माहिती वनविभागाने दिल्याने सकाळी आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडणाऱ्यांनी खबरदारी घेणे आवश्यक आहे.

जामखेड शहर आणि परिसरात बिबट्याच्या अस्तित्वाची माहिती समोर आल्याने नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे. वनविभागाने शहरातील काही भागांमध्ये बिबट्या असल्याची माहिती दिली असून, नागरिकांनी विशेषतः पहाटे आणि रात्रीच्या वेळी सतर्क राहावे, असे आवाहन केले आहे.





