सभापती प्रा. राम शिंदे यांच्याबद्दल मनोज जरांगे पाटील यांचे गौरवोद्गार
मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी सभापती प्रा. राम शिंदे हे चांगले आहेत. कामाचा माणूस आहे इथे जातीपातीचा विषय नाही. अहिल्यादेवी होळकर यांचे वारसदार असूनही अत्यंत साधेपणाने राहतात असे गौरवोद्गार काढले.
आंतरवाली सराटी येथे उपोषण स्थळी आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे यांनी भेट दिली यावेळी सभापती प्रा राम शिंदे यांचा विषय निघाला यावेळी मराठा संघर्ष योध्दे मनोज जरांगे पाटील म्हणाले की सभापती प्रा राम शिंदे हे चांगले आहेत इथे जातीपातीचा विषय नाही.
विधान परिषद सभापती नामदार प्रा.राम शिंदे माणूस म्हणून चांगलाच आहे. चांगल्या व्यक्तींला चांगलेच म्हटले पाहिजे इथे जातीपातीचा काही संबंध नाही येत असे गौरवोद्गार मराठा संघर्ष योद्धा मनोज दादा जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती नामदार प्रा.राम शिंदे यांच्या बद्दल काढले आहेत.
जातीचा विखारी प्रचार करणारे लोक प्रतिनिधी यांच्या डोळ्यात हे झणझणीत अंजनच आहे.प्रामाणिक प्रयत्न, ठाम तात्विक भूमिका, सामान्यांशी नाळ हिच शिंदे साहेबांची स्वभाव वैशिष्ट्य आहेत हेच मराठा योध्दा मनोजदादा जरांगे पाटील यांच्या बोलण्यामधुन अधोरेखित झाले आहे.
सभापती प्रा राम शिंदे यांच्या बद्दल मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी गौरवोद्गार काढल्यामुळे राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.