शाळा व्यवस्थापन समितीकडून पिंपळगाव आळवा जिल्हा परिषद शाळेस वॉटर फिल्टर व वॉटर चिलर भेट

0
370

जामखेड न्युज——

शाळा व्यवस्थापन समितीकडून पिंपळगाव आळवा जिल्हा परिषद शाळेस वॉटर फिल्टर व वॉटर चिलर भेट

शालेय चिमुकल्यांना शुद्ध व थंडगार पिण्याचे पाणी मिळाले या हेतूने शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने पिंपळगाव आळवा जिल्हा परिषद शाळेस वॉटर फिल्टर व वॉटर चिलर भेट देण्यात आले. यामुळे विद्यार्थ्यांना स्वच्छ, थंडगार पिण्याचे पाणी मिळणार आहे. यातून विद्यार्थी निरोगी राहतील.

पिंपळगाव आळवा जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा करण्यात आला यावेळी विद्यार्थ्यांनी भाषणे तसेच लेझीम व डंबेल्स कवायत तसेच देशभक्तीपर नृत्य सादरीकरण करण्यात आले. विविध स्पर्धेतून मिळवलेल्या प्राविण्याबद्दल विद्यार्थ्यांचे मान्यवरांच्या हस्ते मेडल व ट्रॉफी देऊन गौरव करण्यात आला. शालेय विद्यार्थ्यांना स्वच्छ पाणी मिळावे यासाठी शाळा व्यवस्थापन समितीने ६५ हजार किंमतीचे वॉटर फिल्टर व चिलर भेट देण्यात आले.

जामखेड तालुक्यातील पिंपळगाव आळवा जिल्हा परिषद शाळेत रविवारी वॉटर फिल्टर व चिलरचे उद्घाटन सरपंच शोभाताई बाबासाहेब मोहिते यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी त्या म्हणाल्या मानवाला 80 टक्के आजार हे पाण्यामुळे होतात त्या दृष्टीने शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अब्दुलकादर शेख, उपाध्यक्ष नितीन खवळे व सर्व सदस्य तसेच विविध कार्यकारी सोसायटीचे चेअरमन राजू बारवकर, शाळेचे मुख्याध्यापक अशोक घोडेस्वार सर व सर्व शिक्षक वृंद यांच्या अभिनव संकल्पनेतून शाळेतील विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी सुमारे 65000 रु किंमतीचे वॉटर फिल्टर चिलर दिले. 76 व्या गणराज्य दिनाच्या शुभमुहूर्तावर त्याचे उदघाटन करण्यात आले.

या उदघाटन प्रसंगी माजी सरपंच दस्तगिर शेख, माजी सरपंच बाबासाहेब मोहिते, माजी सरपंच साहेबराव बोराटे, विद्यमान उपसरपंच संभाजी पवार, ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब नरके, विष्णू मोहोळकर, प्राध्यापक अनिल नरके, शाळा व्यवस्थापन समितीचे माजी अध्यक्ष अंकुश पवार, शांतीलाल मोहिते, माजी शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष सतीश गायकवाड, विनोद बारवकर, जलाल शेख मेजर, सावता बोराटे, चंद्रसेन भागडे, मज्जिद भाई शेख, बबन गव्हाळे सौ सरताज शेख, तुकाराम गव्हाळे, हनुमान नरके, बाजीराव पवार, राहुल बारवकर, अंगणवाडी सेविका सौ अश्विनी गायकवाड सौ संगीता बोराटे सुनंदा काळे प्रियंका बारवकर तसेच सर्व ग्रामस्थ पालक व माजी विद्यार्थी आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here